Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाचे ऑनलाइन RTI पोर्टल लाँच

 RTI पोर्टल
RTI पोर्टल

पुढारी ऑनलाईन: Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने आज गुरुवारी आपले ऑनलाइन पोर्टल लाँच केले आहे. ज्याद्वारे कोणीही नागरिक सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित माहिती,  या माहिती अधिकार कायद्याअंतर्गत (आरटीआय कायदा) अर्ज दाखल करून मागवू शकणार आहे.  या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित माहिती सहजपणे प्राप्त करता येणार आहे.

माहिती प्राप्त करण्यासाठी नागरिकांना "रजिस्ट्री डॉट एससीआय डॉट जीओव्ही डॉट इन" या वेबसाईटवर जावे लागेल. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती प्राप्त करण्यासाठी नागरिकांना सर्वप्रथम आपली लॉग इन आयडी बनवावी लागेल. त्यानंतर माहितीबाबतचा फॉर्म भरावा लागेल. शेवटी दहा रुपयांचे शुल्क भरावे लागेल, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आली आहे.

आज न्यायालयाचे कामकाज सुनावणी सुरू करण्यापूर्वी, भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी जाहीर केले की ऑनलाइन आरटीआय पोर्टल लवकरच सक्रिय होणार आहे. या ऑनलाईन पोर्टलचा वापर फक्त भारतीय नागरिक आरटीआय अर्ज दाखल करण्यासाठी, प्रथम अपील करण्यासाठी, फी भरण्यासाठी, कॉपी शुल्क इत्यादीसाठी करू शकतात.

ऑनलाइन आरटीआय पोर्टलची मागणी करणाऱ्या विविध जनहित याचिका (पीआयएल) सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. गेल्या आठवड्यात अशाच एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान, CJI चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने हे पोर्टल लवकरच सुरू केले जाईल, असे सांगितले होते. यानंतर हे ऑनलाईन पोर्टल लाेकांच्या सेवेत आजपासून हजर झाले आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news