सनी लिओनी करणार ‘ग्लॅम फेम’ या शोचं परीक्षण

सनी लिओनी करणार ‘ग्लॅम फेम’ या शोचं परीक्षण

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आता अजून एक भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाली असून ती एका नवीन भूमिकेत पाऊल ठेवणार आहे. मॉडेल्सना प्रेरणा देणाऱ्या आगामी रिअॅलिटी शो 'ग्लॅम फेम' मध्ये ती जज बनणार असून ती नवी भूमिका बजावणार आहे.

संबंधित बातम्या 

सनी लिओनीला जज होण्याबद्दल विचारले असता म्हणाली की, 'मॉडेलला प्रेरणा देऊन त्यांना त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी नक्कीच आम्ही मदत करणार आहोत. या शोमधून पुढच्या पिढीच्या महत्त्वाकांक्षी मॉडेल्सना मार्गदर्शन करण्याची अनोखी जवाबदारी माझ्यावर आहे, आणि यासाठी मी उत्सुक आहे. माझा विश्वास आहे की, मॉडेलने सध्याचा ट्रेंड समजून घेतला पाहिजे आणि हे व्यासपीठ प्रतिभावान तरुणांना स्फूर्ती देणार आहे '

या शोमध्ये अभिनेता नील नितीन मुकेश आणि ईशा गुप्ता यांच्यासमवेत सनी लिओनी एका प्रतिष्ठित जजिंग पॅनेलचा भाग असणार आहे. 'ग्लॅम फेम' शोत रोहित खंडेलवाल, संतोषी शेट्टी, दिनेश शेट्टी आणि प्रसिद्ध फॅशन आणि लाइफ स्टाईल फोटोग्राफर डब्बू रतनानी यांसारखे मार्गदर्शकांचा भाग असणार आहे.

व्हॉटवर प्रॉडक्शन आणि कृष्णा कुंज प्रॉडक्शनची सहनिर्मिती असलेला 'ग्लॅम फेम' लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा शो महत्त्वाकांक्षी मॉडेल्सना तज्ञांकडून शिकण्याची आणि स्वतःचे मार्ग तयार करण्याची संधी देऊन मॉडेलिंग उद्योगात बदल घडवून आणेल असे सनीने सांगितले आहे.

सनी लिओनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास अनुराग कश्यपच्या निओ-नॉयर थ्रिलर 'केनेडी' चित्रपटात दिसमार आहे. राहुल भट्ट आणि जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सारा अर्जुनसह तिचा तमिळ 'कोटेशन गँग' हा चित्रपट घेवून योेत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news