IFFI 2023| गोवा : ‘इफ्फी’च्या उद्घाटनाला सलमान खानला निमंत्रण | पुढारी

IFFI 2023| गोवा : 'इफ्फी'च्या उद्घाटनाला सलमान खानला निमंत्रण

पणजी: पुढारी वृत्तसेवा : गोव्यात दि. २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) उद्घाटनाला प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सलमान खान याला आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या सोबतच हॉलीवूड चित्रपट कलाकार मायकल डग्लस यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे, अशी माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे (ईएसजी) उपाध्यक्ष आमदार डिलायला लोबो यांनी आज (दि.७) दिली. (IFFI 2023)

इफ्फीची तयारी जोरात सुरू आहे. सर्व आवश्यक त्या सुविधा पुरवण्यासाठी निविदा काढून ती कामेही सुरू आहेत. विविध चित्रपटगृहे ठरलेली आहेत. पणजीतील आयनॉक्स, सम्राट अशी थिअटर नोंदणी करण्यात आलेली आहे. इफ्फीच्या उद्घाटनासाठी सलमान खान यांना निमंत्रण देण्यात आले आहे. अद्याप त्यांनी निमंत्रण स्वीकारले नसले तरी ते उद्घाटनाला उपस्थित राहतील, अशी आम्हाला आशा आहे, अशी माहिती लोबो यांनी दिली. (IFFI 2023)

पणजीसह इतर ३ ठिकाणी खुल्या जागेमध्ये इफ्फीच्या काही चित्रपटांचे प्रदर्शन लोकांसाठी केले जाणार नाही, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा 

Back to top button