विक्रम गोखलेंचा ‘सूर लागू दे’ नवा चित्रपट नव्या वर्षात भेटीला

सूर लागू दे चित्रपट
सूर लागू दे चित्रपट

पुढारी ऑनलाईन डेस्क : बऱ्याचदा प्रकृती अस्वस्थ असतानाही मोठ्या जिद्दीने अभिनेते विक्रम गोखले यांनी कॅमेरा फेस केला. विक्रम गोखले यांच्या पश्चात 'सूर लागू दे' हा त्यांचा अखेरचा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. नव्या वर्षात जानेवारीमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले होते.

संबंधित बातम्या –

ऑडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्माते नितीन उपाध्याय आणि अभिषेक 'किंग' कुमार यांनी 'सूर लागू दे' या चित्रपटाची निर्मिती केलीय. रतीश तावडे, अश्विन पांचाळ आणि देवांग गांधी या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. गोखलेंची अखेरची कलाकृती ठरलेल्या 'सूर लागू दे' या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण विजया एकनाथ बिर्जे यांनी केलं आहे.

पिकल एंटरटेन्मेंट स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात येणार आहे. ३० ऑक्टोबर रोजी अभिनेते विक्रम गोखले यांचा वाढदिवस असतो. याच दिवसाचं औचित्य साधत बांद्रा येथील एमआयजी क्लबमध्ये विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली विक्रम गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते 'सूर लागू दे'च्या नवीन पोस्टरचं अनावरण करण्यात आलं होतं.

सूर लागू दे चित्रपट
सूर लागू दे चित्रपट

या चित्रपटाचं लेखन आशिष देव यांनी केलं असून, संगीतकार पंकज पडघन यांनी संगीत दिलं आहे. मालिकांसोबत मराठी चित्रपटांमध्ये झळकलेली रीना मधुकर आणि 'कलियों का चमन…' फेम मेघना नायडू या चित्रपटातील सरप्राईज पॅकेज आहेत. त्यांच्या जोडीला आशिष नेवाळकर, जयराज नायर, सुनील गोडबोले, सिद्धेश्वर झाडबुक्के, नितीन जाधव, आशा न्याते, मेरू वेरणेकर, अनुराधा मोरे, शेखर शुक्ला, संदीप गायकवाड, हितेंद्र उपासनी, प्रदीप पटवर्धन, अस्लम वाडकर, सोमनाथ तळवलकर, सुनील जाधव, दीपिका गोलीपकर, अलका परब, अतुल गानोरकर, दिलीप कराडे, संदीप जयगडे, अमोघ चव्हाण, औदुंबर बाबर आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट १२ जानेवारी २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news