Sunny Leone : ग्लॅमरस सनी लिओनी IFFSA च्या रेड कार्पेटवर, यलो स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये चमकली

sunny leone
sunny leone

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनुराग कश्यप दिग्दर्शित 'केनेडी' या चित्रपटात सनी लिओनीच्या चार्ली स्त्रीच्या भूमिकेला जगभरातून दाद मिळाली. (Sunny Leone ) कान्सच्या अभूतपूर्व यशानंतर हा चित्रपट इतर अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आणि ज्याने जगभरात सनीच कौतुक झालं. (Sunny Leone )

संबंधित बातम्या –

दक्षिण आशियातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सनी लिओनी पुन्हा एकदा "केनेडी" मधून आपली चमक दाखवून गेली आणि प्रेक्षकांना भावली. सनी लिओनी "केनेडी"च्या प्रीमियरमध्ये दक्षिण आशियाच्या रेड कार्पेटच्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये पिवळ्या स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये चमकली. सनीचा फॅशनेबल अंदाज सगळ्यांची मन जिंकून गेला.

स्टायलिस्ट चांदनी मेहता हिने हा लूक स्टाईल केला होता. रेड कार्पेटवर सनी ने पुन्हा एकदा आपल्या मोहक रूपाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. दक्षिण आशियातील "केनेडी"च्या प्रीमियरमध्ये सनीने सगळ्यांची नजर चोरून घेतली. अलीकडील " मेरा पिया घर आया 2.0" इंटरनेटवर धुमाकूळ घालत असताना ती "कोटेशन गँग" या तिच्या नवीन चित्रपटाने ती तमिळ चित्रपटसृष्टीतही पदार्पण करणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news