Vanita Kharat : महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये खळखळून हसवणारी वनिता आता दाक्षिणात्य चित्रपटात | पुढारी

Vanita Kharat : महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये खळखळून हसवणारी वनिता आता दाक्षिणात्य चित्रपटात

पुढारी ऑनलाईन डेस्क : चतुरस्त्र अभिनेत्री वनिता खरातचा ( Vanita Kharat ) मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या आजवरच्या सगळ्याच भूमिकांचं चाहत्यांनी भरभरून कौतुक केलंय. मराठीसोबत हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये ती दिसत असते. त्यामुळे आणखी कोणत्या नव्या भूमिकेत ती दिसणार? हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असतात. आता मराठी, हिंदीनंतर वनिता दाक्षिणात्य चित्रपटामध्ये दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे.

संबधित बातम्या 

वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या वनिताचा ( Vanita Kharat ) ‘साऊथ इंडियन’ लूक नुकताच समोर आला आहे. या लूकमधील नुकताच वनिताचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या फोटोवरून ती नेमकी कोणत्या चित्रपटात काम करणार आहे? असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमधून ‘एकदा येऊन तर बघा’ असं म्हणत तिने चाहत्यांना थेट चित्रपटाचे आमंत्रण दिलं आहे. येत्या २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात वनिता दाक्षिणात्य अंदाजात दिसणार आहे.

या चित्रपटात वनितासोबत गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार, राजेंद्र शिसातकर, शशिकांत केरकर, सुशील इनामदार, रोहित माने आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. लेखक-अभिनेता प्रसाद खांडेकर ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहे.

‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे. चित्रपटाची कथा परितोष पेंटर यांची असून पटकथा, संवाद प्रसाद खांडेकर यांचे आहेत. गीते मंदार चोळकर यांची असून रोहन-रोहन, कश्यप सोमपुरा यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन योगेश कोळी तर संकलन निलेश गावंड यांचे आहे. कार्यकारी निर्माते मनोज अवाना तर लाईन प्रोड्युसर मंगेश जगताप आहेत. यामुळे ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

वेगळी भूमिका करण्याची संधी प्रत्येक कलाकार शोधत असतो. ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने ही संधी मला मिळाली असून माझं हे पात्र चाहत्यांचे नक्कीच मनोरंजन करेल, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button