Sunny Leone In Cannes : सनीची वाईन रेड वेल्वेट ड्रेसमध्ये आणखी एक फॅशन स्टाईल (Exclusiv Pics)

sunny leone
sunny leone

पुढारी ऑनलाईन डेस्क : कान्स चित्रपट महोत्सव अनेक आकर्षक फॅशन चर्चांनी गाजला आहे आणि भारतीय सेलिब्रिटी आंतरराष्ट्रीय मंचावर आपली एक अनोखी छाप सोडत आहेत. (Sunny Leone In Cannes ) या वर्षातील सनी लिओनीने उपस्थिती लावत तिच्या अनोख्या अदांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. (Sunny Leone In Cannes )

रेड कार्पेटवर पाऊल ठेवत सनीने तिच्या फॅशनने सगळ्यांची मने जिंकून घेतली. वाईन रेड वेल्वेट बॉडी-कॉन ड्रेसमध्ये सनी अगदीच सुंदर दिसत होती. प्रसिद्ध फॅशन उस्ताद जेमी मालौफ यांनी डिझाइन केलेले, खोल रुबी रंगाने सनीचे उठून दिसते. तिच्या प्रत्येक गोष्टी कान्स मध्ये कॅप्चर केल्या जात आहेत.

प्रतिष्ठित डिझायनर हेलेना जॉयच्या सुंदर दागिन्यांसह तिच्या लूकला अजून बहारदारपणा आला आहे. तिच्या रेड-कार्पेटवरील अनेक क्षणांनी लक्ष वेधून घेतले.

प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यपच्या दिग्दर्शनाखाली, कान्स ज्युरीने मध्यरात्री प्रदर्शनासाठी निवडलेल्या "केनेडी" या एकमेव भारतीय चित्रपटाचे ती प्रतिनिधित्व करत आहे. कान्सला रवाना होण्यापूर्वी, सनीने एक टीझर आऊट केला जो प्रेक्षकांना "केनेडी" च्या मोहक दुनियेची एक झलक दाखवतो. आता तो रुपेरी पडद्यावर रिलीज होण्यासाठी सगळेच उत्साही आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news