Sudhir Mungantiwar : पद्म पुरस्कार शिफारस समितीच्या अध्यक्षपदी सुधीर मुनंगटीवार

Sudhir Mungantiwar : पद्म पुरस्कार शिफारस समितीच्या अध्यक्षपदी सुधीर मुनंगटीवार
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या मान्यवरांची शिफारस करणाऱ्या पद्म पुरस्कार शिफारस समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे वने व सांस्कृतीक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विविध क्षेत्रात अतीउत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या मान्यवरांची शिफारस करण्याकरीता केंद्रशासनाने राज्यशासनाला निर्देश दिले आहेत. 26 जानेवारी 2023 रोजी घोषीत होणाऱ्या पद्म पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे करावयाची आहे. त्यामुळे राज्यात शिफारस समिती गठीत करण्यात आली आहे. राज्याच्या पद्म पुरस्कार शिफारस समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे वने व सांस्कृतीक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच समिती सदस्यांमध्ये उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण, क्रिडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, बंदरे व खणीकर्म मंत्री दादा भूसे यांचा समावेश आहे. तर सदस्य सचिव म्हणून प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याची शिफारस समिती शासनाकडे विविध प्रस्तावांची छाननी करून केंद्रशासनाकडे पाठविणार आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news