उत्तरपत्रिकेत ‘जय श्री राम’ लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळाले ६० टक्के गुण

उत्तरपत्रिकेत ‘जय श्री राम’ लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळाले ६० टक्के गुण

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील जौनपूरच्या वीर बहादूर सिंह पूर्वांचल विद्यापीठात उत्तरपत्रिकेत 'जय श्री राम' लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकाने ६० टक्क्यांहून अधिक गुण दिले. गुण देण्याच्या बदल्यात संबंधित शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून पैसे उकळल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वीर बहादूर सिंग पूर्वांचल विद्यापीठातील दोन प्राध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे.

वीर बहादूर सिंह पूर्वांचल विद्यापीठात उत्तरपत्रिकांच्या तपासणीत अनेक गैरप्रकार समोर आले आहेत. विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी फार्मसी विभागाच्या उत्तरपत्रिका तपासणीदरम्यान उत्तराऐवजी जय श्री राम लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक गुण दिले होते. याप्रकरणी आरटीआय दाखल केली होती. त्यानंतर बाह्य शिक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या. ज्या विषयात विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी ५२ व ३४ गुण दिले होते, तीच उत्तरपत्रिका बाहेरील शिक्षकांनी तपासली असता विद्यार्थ्यांना त्यात ० व ४ गुण मिळाले. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून कुलगुरू वंदना सिंह यांनी दोन प्राध्यापकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news