प्रजासत्ताक दिनाच्या प्रभातफेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थीनीचा मृत्यू

नांदगाव,www.pudhari.news
नांदगाव,www.pudhari.news

नाशिक, नांदगाव : पुढारी ऑनलाइन 

तालुक्यातील जातेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जनता माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेणारी विद्यार्थिनी पूजा दादासाहेब वाघ (१५) हिचे दि. २६ जानेवारी रोजी प्रजाक सत्ताक दिनाच्या प्रभातफेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. या घटनेने गावात  हळहळ व्यक्त केली जात आहे.

शाळेतील प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण कार्यक्रम संपल्यानंतर येथील ग्रामपालिकेच्या ध्वजारोहणासाठी जात असताना सुरू असलेल्या प्रभात फेरी दरम्यान वंदे मातरम् भारत माता की जय या घोषणा देत असताना पूजा अचानक चक्कर येऊन पडली.  पूजा ला तातडीने बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. पुजा हिची प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप जायभार यांनी  नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला.

याबाबत पुजाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला जन्मापासूनच श्वासोच्छवासा संबधी त्रास होतो. श्वास घेताना तीला त्रास होत. तिची तपासणी केली असता तिच्या फुफ्फुसाला होल असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. तिची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती मात्र, त्यापूर्वीच तीचे असे निधन झाले. तीच्यावर शोकाकुल वातावरणात येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याकडे चौकशी केली असता विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध प्रकारच्या योजना असतात त्यातून शक्य तितकी मदत तिच्या पालकांना करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news