Pune Accident : पुण्यातील नवले पूल चौकात विचित्र अपघात; तीन ट्रक एकमेकांवर आदळली

Pune Accident : पुण्यातील नवले पूल चौकात विचित्र अपघात; तीन ट्रक एकमेकांवर आदळली

धायरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : वडगाव बुद्रुक परिसरातील नवले पुलाच्या चौकात कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावर गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास तीन ट्रकचा विचित्र अपघात झाला. या अपघात एक ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला असून, तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. बाळासाहेब बढे (वय 26, रा. वेल्ली, ता. पाथर्डी, जि. नगर), असे जखमी चालकाचे नाव आहे. आयशर ट्रक व स्टीलचे रॉड भरलेला ट्रेलर बाह्यवळण मार्गावरून कात्रजकडून नवले पुलाकडे येत होते. त्या वेळी चालकांचे नियंत्रण सुटल्याने आयशर ट्रकची सिग्नलला थांबलेल्या डंपरला धडक बसली. त्यापाठीमागे असलेल्या ट्रेलरची ट्रकला धडक बसली.

या धडकेत आयशर ट्रकचालक दोन्ही वाहनांमध्ये अडकला. सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार व वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अरविंद पवार कर्मचार्‍यांसंमवेत घटनास्थळी पोहचले. त्यांनी क्रेनच्या साहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करून या चालकाला बाहेर काढले व उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार तपास करीत आहे. दरम्यान, या अपघातामुळे नवले पूल चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news