सोलापुरात हिंदू जनआक्रोश मोर्चादरम्यान दुकानांवर दगडफेक; २ जणांना अटक

हिंदू जन आक्रोश मोर्चा
हिंदू जन आक्रोश मोर्चा

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा सोलापुरातील हिंदू जन आक्रोश मोर्चादरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, अन्य 12 ते 15 अनोळखी व्यक्तीं विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सोलापुरात कायदा आणि सुव्यवस्था ज्यांनी कोणी हातात घेण्याचा प्रयत्न केला असेल, त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी एमआयएमआयएम शहर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांनी केली आहे.

भाजप आमदार नितेश राणे आणि तेलंगणातील भाजप आमदार टी राजा सिंग यांच्या उपस्थितीत काल सोलापुरात वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कन्ना चौकपर्यंत हा मोर्चा निघाला होता. मात्र हा मोर्चा मधला मारुती परिसरात आल्यानंतर काही दुकानांची अज्ञात लोकांनी तोडफोड केली. तर काही जण दगडफेकीमुळे जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थवरून सतीश शिंदे आणि शेखर स्वामी या दोघांना ताब्यात घेतलेलं होतं. रात्री उशिरा या दोघाना अटक करून अन्य 12 ते 15 अनोळखी संशयीत आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तोडफोडप्रकरणी एमआयएमची कडक कारवाईची मागणी….

दरम्यान या मोर्चाच्या पूर्वी भाजप आमदार नितेश राणे, आमदार टी राजा सिंग या दोघांनाही पोलिसांनी नोटीस बजावली होती. तेढ निर्माण होईल अशी आक्षेपार्ह वक्तव्य करू नये, अशा आशयाची ही नोटीस होती. सभेदरम्यान नितेश राणे आणि टी राजा सिंग यांनी कोणताही आक्षेपर्ह वक्तव्य केलं असेल तर त्यांची तपासणी करून रीतसर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई करावी, या मागणीचे निवेदन देणार असल्याची प्रतिक्रिया एमआयएमचे शहराध्यक्ष फारुक शाब्दी यांनी दिली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news