लोकसभा निवडणूक लढवणार : संभाजीराजे | पुढारी

लोकसभा निवडणूक लढवणार : संभाजीराजे

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या लोकसभा निवडणूकीतील जखम अजून विसरलेलो नाही. कोल्हापूर, नाशिक की संभाजीनगर हे अजून ठरलेले नाही, असे सांगत माजी खासदार संभाजीराजे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. कोल्हापूर माध्यम प्रतिनीधींशी ते बोलत होते. स्वराज्य संघटना मुख्य प्रवाहात राहणार यामध्ये दुमत असण्याचे कारण नाही. मात्र आम्ही अजून किती जागा लढवणार याबाबत अजून स्पष्टता नाही. आमच्यावर कोणीही वार करू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हाला सर्वांना दिसेल. स्वराज्यबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. चर्चेसाठी सर्वांसाठी दरवाजे खुले असल्याचे ते म्हणाले. जे कोणी जास्त प्रेम देतील तिथे संभाजीराजे उभारणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे लोकसभेसाठी मैदानात उतरणार असल्याची घोषणा एक प्रकारे संभाजीराजे यांनी करून टाकली आहे. मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका न घेतल्यास दिल्ली ठाण मांडून बसू असा इशारा दिला.

Back to top button