धुळ्यात माजी नगरसेविकेच्या घरावर दगडफेक

धुळ्यात माजी नगरसेविकेच्या घरावर दगडफेक

धुळे : पुढारी वृत्तसेवा

माजी नगरसेविकेच्या घरावर दगडफेक करून दहशतीचे वातावरण तयार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे शहरातील चितोड रोड परिसरात माजी नगरसेविका माधवी नेमाने यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थानी राहुल गजानन थोरात उर्फ टाल्या, सचिन कोळवले उर्फ भुऱ्या आणि बबुवा कंधारे या तिघांनी दगडफेक केले आहे. तत्पूर्वी त्यांनी नेमाने यांना रस्त्यात अडवून त्यांच्याकडून खंडणी रूपाने पैशांची मागणी केली. मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने या तिघाही तरुणांनी त्यांना शिवीगाळ देखील केली. यानंतर थेट घरामध्ये शिरून संसार उपयोगी साहित्याची नासधूस करत घरावर दगडफेक केली. यानंतर नेमाने परिवाराने थेट शहर पोलीस ठाणे गाठून या घटनेची माहिती दिली. त्यानुसार राहुल थोरात, सचिन कोळवले, आणि बबुवा कंधारे या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news