Pawan Singh : गायक पवन सिंहवर दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज (Video)

Pawan Singh
Pawan Singh
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : लॉलीपॉप लागेलू गाना गाणारे प्रसिद्ध भोजपुरी गायक पवन सिंह (Pawan Singh) यांच्यावर दगडफेक करण्यात आली. उत्तर प्रदेशातील एका लाईव्ह शोमध्ये पवन सिंह यांच्या कार्यक्रमात गोंधळ उडाला. गर्दीतून भिरकावण्यात आलेला दगड पवन सिंह यांच्या गालावर लागला आणि ते जखमी झाले. गोंधळात कुर्च्यांची तोडफोड झाली. दरम्यान, पोलिसांनी लाठीचार्ज करून उपद्रवींना रोखण्याचा प्रयत्न केला. (Pawan Singh)

सूत्रांच्या माहितीनुसार, एका प्रेक्षकाने पवनकडे एक खास गाणे गाण्यासाठी सांगितले. हे गाणे जातीशी संबंधित असल्यामुळे पवन यांनी ते गाणे गाण्यास नकार दिला. त्यचवेळी पवन यांच्यावर दगडफेक झाली. संपूर्ण घटना नगरा ठाणे क्षेत्रातील एका गावातील आहे. येथे लग्नाचे एक रिसेप्शन होते. यामध्ये पवन सिंह, शिल्पी राज आणि अंजना सिंह आले होते. यावेळी प्रचंड गर्दी होती.

दगड लागल्यानंतर पवन भडकले. ते म्हणाले, "हा कोण आहे जो गर्दीत लपून वार करत आहे. हा कोण शत्रू आहे, ज्याने मला दगड मारला आहे. इतक्या गर्दीत फॅन्स आले आहेत, हा कोण माझा दुश्मन आहे. तुझ्यात एवढी पॉवर आहे तर समोर येऊन दाखव. एका दगडाने पवनला कुणी रोखू शकणार नाही. आजपर्यंत कुणी रोखू शकलं नाही."

video-Niraj Shukla twitterवरून साभार 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news