पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजार बुधवारी (दि.२१) तेजीत खुला झाला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १५० अंकांनी वाढून ७३,२०० वर गेला. तर निफ्टीने सुरुवातीच्या व्यवहारात नवे शिखर गाठले. निफ्टी २२,२४८ वर खुला झाला. निफ्टीला बँकिंग, फायनान्सियल आणि ऑटो स्टॉक्समुळे सपोर्ट मिळाला आहे. तर आयटी आणि मीडिया क्षेत्रात विक्री दिसून येत आहे. (Stock Market Updates)
सेन्सेक्सवर टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, एम अँड एम, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, एसबीआय हे टॉप गेनर्स आहेत. तर पॉवर ग्रिड, इन्फोसिस, एचसीएल टेक, ॲक्सिस बँक या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
निफ्टी आज २२,२४८ वर खुला झाला. निफ्टीवर टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, हिंदाल्को, आयसीआयसीआय बँक, आयशर मोटर्स हे १ ते २ टक्क्यांनी वाढले आहेत. तर बीपीसीएल, पॉवर ग्रिड, इन्फोसिस हे शेअर्स घसरले आहेत. (Stock Market Updates)
निफ्टीने सलग दुसऱ्या दिवशी नवा उच्चांक नोंदवला. जागतिक बाजारात सुस्ती आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून काही प्रमाणात विक्री असतानाही भारतीय बाजारात मजबूत ट्रेंड दिसत आहे.
हे ही वाचा :