Stock Market Updates | शेअर बाजारात चढ-उतार, ‘हे’ शेअर्स आज ॲक्शनमध्ये?

Stock Market Updates | शेअर बाजारात चढ-उतार, ‘हे’ शेअर्स आज ॲक्शनमध्ये?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : डिफॉल्ट टाळण्यासाठी अमेरिका लवकरच कर्ज मर्यादा डील पर्यंत पोहोचेल या शक्यतेने आणि जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांचा मागोवा घेत आज भारतीय शेअर बाजाराने आज तेजीत सुरुवात केली होती. पण त्यानंतर काही वेळातच दोन्ही निर्देशांकांनी तेजी गमावली. बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स १५० हून अधिक अंकांनी वाढला होता. त्यानंतर सकाळी १०.४२ च्या सुमारास सेन्सेक्स सुमारे १६१ अंकांच्या घसरणीसह ६१,२७० वर होता. तर निफ्टी १८ हजारांवर होता. सुरुवातीला बँकिंग, फायनान्सियल आणि आयटी स्टॉक्स आघाडीवर होते. (Stock Market Updates)

सेन्सेक्सवर एसबीआय, इन्फोसिस (Infosys), टेक महिंद्रा, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट आणि टाटा मोटर्स हे वाढले आहेत. तर टायटन, मारुती, एम अँड एम, इंडसइंड बँक (IndusInd Bank), आयटीसी आणि टाटा स्टील (Tata Steel) यांचे शेअर्स घसरले आहेत.
फूटवेअर मेकर Bata India ने अपेक्षेपेक्षा चांगला नफा तिमाहीत नोंदवल्यानंतर त्यांचे शेअर्स सुमारे ४ टक्के वाढले. कच्च्या मालाची किंमत कमी झाली असून बाटाच्या Hush Puppies सारख्या ब्रँडची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर bata india share price मध्ये वाढ झाली. आज या शेअरची किंमत १,५५२ रुपयांवर गेली. दरम्यान, Tata Elxsi च्या शेअरमध्ये चौथ्या तिमाही निकालानंतर ४ टक्के घसरण झाली. (Stock Market Updates)

Nifty IT आणि Nifty PSU Bank हे क्षेत्रीय निर्देशांक वाढले आहेत. दरम्यान ऑटो, FMCG, मेटल, फार्मा, रियल्टी, ऑईल अँड गॅस हे घसरले आहेत.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps.

Stay updated with the latest news at your fingertips.

Android

iOS

Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news