Stock Market Updates | RBI च्या पतधोरण निर्णयानंतर सेन्सेक्स ४५० अंकांनी कोसळला, जाणून घ्या कारण

Stock Market Updates | RBI च्या पतधोरण निर्णयानंतर सेन्सेक्स ४५० अंकांनी कोसळला, जाणून घ्या कारण
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी (दि.१०) सेन्सेक्स तब्बल ४५० अंकांनी घसरून ६५,५३९ वर आला. तर निफ्टी ११८ अंकांनी घसरून १९,५०० वर आला. बँकिंग, आयटी, एफएमसीजी स्टॉक्समध्ये घसरण झाली आहे. तर मीडिया, मेटल, फार्मा आणि रियल्टी स्टॉक्समध्ये खरेदी दिसून येत आहे. आज सेन्सेक्स

सेन्सेक्स आज ६५,९४५ वर खुला झाला. त्यानंतर तो ६५,५०० पर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, आयटीसी, टीसीएस, एचसीएल टेक, एलटी हे शेअर्स घसरले. तर विप्रो, एम अँड एम हे शेअर्स हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट जैसे थे म्हणजे ६.५० टक्के एवढा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे सलग तिसऱ्यांदा आरबीआयने रेपो दरात बदल केलेला नाही. आरबीआयच्या या निर्णयामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. शक्तिकांत दास यांनी पतधोरण समितीच्या बैठकीत (Monetary Policy Committee) घेतलेल्या या निर्णयाची आज माहिती दिली. (RBI monetary policy) "पतधोरण समितीने रेपो रेट ६.५० टक्के एवढा कायम ठेवण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे", असे शक्तिकांत दास यांनी सांगितले.

१९ मे ते २८ जुलै या कालावधीसाठी कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजेच 'सीआरआर' (CRR) लागू करण्यात आला आणि आरबीआय ८ सप्टेंबर रोजी त्याचा आढावा घेईल, असे दास यांनी म्हटले आहे. हे पाऊल निव्वळ तात्पुरता उपाय असल्याचे त्यांनी पुढे नमूद केले. "कार्यक्षमपणे तरलता व्यवस्थापनासाठी अतिरिक्त तरलतेच्या पातळीचे सतत मूल्यांकन करणे आवश्यक आहे, जेणेकरुन अतिरिक्त तरलतेचा घटक पकडण्यासाठी जेव्हा आवश्यक असेल तेव्हा अतिरिक्त उपाययोजना केल्या जातील," असे दास म्हणाले.

दरम्यान, आरबीआयच्या या निर्णयामुळे बाजारातील तरलतेच्या (liquidity) स्थितीबद्दल चिंता निर्माण झाली आणि परिणामी बँकिंग स्टॉक्समध्ये विक्री दिसून आली.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news