विमा : ईडीएलआयच्या अंतरंगात…

विमा : ईडीएलआयच्या अंतरंगात…
Published on
Updated on

सत्यजित दुर्वेकर

सरकारने खासगी क्षेत्रात कर्मचाऱ्यांना जीवन विम्याचे लाभ देण्यासाठी १९७६ मध्ये एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (इडीएलआय) सुरू केली.

'इडीएलआय' हे विमा कवच असून ते इपीएफओ धारकांसाठी महत्त्वाचे आहे. सेवेच्या कालावधीदरम्यान विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास वारसदारास किंवा नॉमिनीला एकरकमी पैसे दिले जातात. 'इडीएलआय'चा उद्देश पाहिल्यास एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास 'इपीएफओ' धारक कुटुंबाला आर्थिक आधार देणे होय. अर्थात या योजनेचा एखादा लाभार्थी आहे किंवा एखादा नाही, असे नाही. कोणीही वर्ज्य नाही. कर्मचाऱ्यांचे शेवटचे वेतन हे त्याच्या वारसाला मिळणाऱ्या लाभाची मर्यादा ठरवतात.

'इडीएलआय'चे वैशिष्ट्ये : डीएलआय योजना ही १५ हजार रुपयांपेक्षा कमी मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू होते. मूळ वेतन १५ हजार रुपयांपेक्षा अधिक राहत असेल तर त्याचा कमाल फायदा ६ लाख रुपये आहे. मात्र २८.४.२०२१ पासून इपीएफओने कमाल लाभात वाढ करत ती ७ लाख रुपये केली. कर्मचाऱ्यांना इडीएलआयमध्ये योगदान देण्याची गरज नाही. केवळ इपीएफ असणे गरजेचे आहे. डीएल आयनुसार दीड लाख रुपयांचा बोनस मिळतो. तो वाढवून अडीच लाख रुपये केला आहे. ही वाढ दोन वर्षांसाठी वैध होती. पण या किमान लाभास इपीएफओने १५ फेब्रुवारी २०२० पासून मुदतवाढ दिली. कोणत्याही संघटनेत २० पेक्षा अधिक कर्मचारी असतील, त्यास इपीएफसाठी नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांकडे इपीएफचे खाते असते, तो आपोआप इडीएलआय योजनेसाठी पात्र असतो. एखादा कर्मचारी अन्य समुहाची योजना घेऊ शकतो. मात्र इडीएलआयनुसार देण्यात येणारे लाभ हे त्या समकक्ष किंवा त्यापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. 'इडीएलआय' च्या तरतुदींनुसार कंपनीचे योगदान हे मूळ वेतनाच्या ०.५ टक्के किंवा कमाल दरमहा ७५ रुपये असते. अन्य दुसऱ्या समूहाची विमा योजना घेतलेली नसेल तर कमाल योगदान पंधरा हजारापर्यंत करता येते.

शुल्काचे आकलन : विमाधारक व्यक्तीच्या मृत्यूच्या स्थितीत नॉमिनी असलेल्या व्यक्तीला एकरकमी पैसे दिले जातात. एखादा नॉमिनी किंवा लाभार्थ्याची नोंद नसेल तर त्याची रक्कम कायदेशीर वारसदारास दिली जाते. २८.०४. २०२१ पासून लागू करण्यात आलेला लाभ हा पुढीलप्रमाणे आकडेमोड करत देण्यात येतो. बारा महिन्यांतील कर्मचाऱ्याचे सरासरी वेतन (पंधरा हजार रुपये गुणीले ३०) + बोनसची रक्कम (अडीच लाख रुपये). यासाठी 'इडीएलआय'नुसार कमाल पेमेंट ७ लाख रुपये निश्चित करण्यात आले आहे.

'इडीएल आय साठी पात्रता : कोणत्याही कर्मचाऱ्यास इडीएल आयनुसार विमा कवच मिळवण्यासाठी काही निकष पूर्ण करावे लागतील. कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन १५ हजार रुपयांपर्यंत असणे गरजेचे आहे. एखाद्या कर्मचाऱ्याचे वेतन पंधरा हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तर इडीएल आयनुसार देण्यात येणारा कमाल लाभ ७ लाख रुपये आहे. इडीएलआय योजनेचा पर्याय निवडण्यासाठी कंपनीत, संस्थेत २० पेक्षा अधिक कर्मचारी असणे गरजेचे आहे.

इडीएलआय योजनेचे लाभ : इडीएलआय योजनेनुसार सेवेच्या काळात कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मोफत विमा कवच प्रदान केले जाते. इडीएलआयसंदर्भात कंपनीचे योगदान खूपच कमी राहते. मात्र योजनेनुसार मिळणारा लाभ हा मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक रूपाने मदत करण्यासाठी उपयुक्त आहे. इडीएलआय योजनेसाठी सर्व कर्मचारी पात्र असतात. त्यात प्रत्येक कर्मचाऱ्याला कवच दिले जाते. एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू परदेशात झाला असला तरीही त्याच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळेल.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news