Stock Market Closing | सेन्सेक्स सलग तिसऱ्या दिवशी वधारला, ‘या’ स्टॉक्सची चमकदार कामगिरी

Stock Market Closing | सेन्सेक्स सलग तिसऱ्या दिवशी वधारला, ‘या’ स्टॉक्सची चमकदार कामगिरी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांची सावध भूमिका दिसून आली. सपाट सुरुवात केलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने नंतर काही प्रमाणात वाढून व्यवहार केला. सेन्सेक्स (Sensex) ८५ अंकांनी वाढून ६३,२२८ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) ३९ अंकांनी वाढून १८,७५५ वर स्थिरावला. सेन्सेक्स सलग तिसऱ्या दिवशी वाढून बंद झाला आहे. (Stock Market Closing)

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या निर्णयापूर्वी बुधवारी भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने सावध सुरुवात केली होती. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) सुमारे ५० अंकांनी घसरून ६३,०९० वर होता. तर निफ्टी (Nifty) १८,७१६ वर होता. (Stock Market Updates) त्यानंतर दोन्ही निर्देशांक सावरत किरकोळ वाढले. या तेजीत मेटल, रियल्टी, ऑटो स्टॉक्स आघाडीवर होते. त्याशिवाय रिलायन्स, टाटा समुहाच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.

सेन्सेक्सवर टाटा स्टील, टाटा मोटर्स, पॉवर ग्रिड, रिलायन्स, एनटीपीसी, अल्ट्राटेक, नेस्ले, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स वाढले. तर बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, भारती एअरटेल, ॲक्सिस बँक, इन्फोसिस, बजाज फायनान्स हे शेअर्स घसरले.

आयटी स्टॉक्सवर दबाव

आयटी स्टॉक्सवर आज दबाव राहिला. इन्फोसिस, पर्सिस्टंट सिस्टम्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो आणि भारतातील प्रमुख आयटी सेवा कंपन्यांचे शेअर्स बुधवारी दबावाखाली होते. ही घसरण विदेशी ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने संपूर्ण आयटी सेवा क्षेत्राबाबतच्या व्यक्त केलेल्या नकारात्मक भूमिकेनंतर झाली.

'या' शेअरची कमाल

स्पेशालिटी केमिकल्स फर्म अनुपम रसायन कंपनीचा शेअर (Anupam Rasayan shares) बीएसईवर ६ टक्के वाढून १,१५० रुपयांवर पोहोचला. या कंपनीने जपानमधील आघाडीच्या विशेष रासायनिक कंपनीसोबत लेटर ऑफ इंटेंटवर स्वाक्षरी केली आहे. या पार्श्वभूमीवर अनुपम रसायनचा शेअर वधारला. (Stock Market Closing)

अमेरिका, आशियाई बाजारात तेजी

अमेरिकेतील महागाईत घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर येथील शेअर बाजारात मंगळवारी तेजी राहिली. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल इस्टेट (Dow Jones Industrial Average) ०.४ टक्के वाढला. एस अँड पी ५०० (S&P 500) ०.७ टक्के आमि नॅस्डॅक कंपोझिट निर्देशांक (Nasdaq Composite Index) ०.८ टक्के वाढून बंद झाला. दरम्यान, आशियाई बाजारातही बुधवारी तेजीचे वातावरण होते. जपानचा निक्केई १.४७ टक्के वाढून ३३,५०२ वर पोहोचला. चीनचा शांघाय कंपोझिट ०.२४ टक्के वाढला आहे. पण कोरियाचा कोस्पी घसरला.

परदेशी गुंतवणूकदारांचा पुन्हा खरेदीवर जोर

NSE डेटानुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) मंगळवारी निव्वळ आधारावर १,६७८ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी २०३ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. (Stock Market Updates)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news