Sensex Nifty hit fresh record highs | शेअर बाजारात तेजीची लाट कायम, सेन्सेक्स, निफ्टीचा नवा विक्रमी उच्चांक, ‘हे’ हेवीवेट्स शेअर्स तेजीत

Sensex
Sensex

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजाराची विक्रमी घौडदौड सुरुच आहे. आज सोमवारी (दि.८) सेन्सेक्सने ३५० हून अधिक अंकांनी वाढ नोंदवत ७४,६५८ च्या अंकाला स्पर्श केला. सेन्सेक्सचा हा नवा सर्वकालीन विक्रमी उच्चांक आहे. तर निफ्टीने २२,६२३ अंकांचा नवा उच्चांक नोंदवला. अमेरिकेतील बाजारातील तेजीचा मागोवा घेत तसेच आयटी आणि ऑटो शेअर्समधील खरेदीमुळे शेअर बाजाराने मजबूत सुरुवात केली आहे. (Sensex Nifty hit fresh record highs )

दरम्यान, बाजारातील आजच्या सर्वकालीन उच्चांकामुळे बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलाने प्रथमच ४०० लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला.

सेन्सेक्स आज ७४,५५५ वर खुला झाला. त्यानंतर त्याने ७४,६५८ पर्यंत उच्चांकी वाढ नोंदवली. सेन्सेक्सवर रिलायन्स, एम अँड एम, पॉवर ग्रिड, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. तर विप्रो, एचडीएफसी बँक या शेअर्समध्ये किरकोळ घसरण दिसून येत आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपही तेजीत आहेत.

निफ्टी आज २२,५७८ वर खुला झाला. त्यानंतर त्याने २२,६२३ च्या अंकाला स्पर्श केला. टाटा कन्झ्यूमर, रिलायन्स, एम अँड एम, बीपीसीएल, पॉवर ग्रिड हे शेअर्स सर्वाधिक वाढले. अदानी पोर्टस्, अपोलो हॉस्पिटल हे शेअर्स घसरले आहेत.

सकाळच्या व्यवहारात रियल्टी आणि मेटल शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ९० डॉलरच्या खाली आल्याने तेल विपणन कंपन्यांचे (OMC) शेअर्सही वधारले आहेत.

 हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news