Stock Market Today | शेअर बाजारात घसरण, ‘या’ स्टॉक्सना फटका

Stock Market Crash
Stock Market Crash
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या सत्रात लाल चिन्हात खुला झाला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३३० अंकांनी घसरून ६२,९०८ वर आला. तर निफ्टी १८,७०० च्या खाली आला. मुख्यतः बँकिंग आणि आयटी स्टॉक्समध्ये घसरण झाली. दरम्यान, सकाळी पावणेअकराच्या सुमारास सेन्सेक्सची घसरण कमी झाली होती.

काल सेन्सेक्स ६३,२३८ वर बंद झाला होता. आज शुक्रवारी तो ६३,१२४ वर खुला झाला. त्यानंतर सेन्सेक्स ६२,८७४ पर्यंत खाली आला.
सेन्सेक्सवर टेक महिंद्रा, पॉवर ग्रिड, टाटा मोटर्स, टायटन, एसबीआय, टाटा स्टील, इन्फोसिस, सन फार्मा, एचसीएल टेक, टीसीएस, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स घसरले. तर भारती एअरटेल, एनटीपीसी, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, नेस्ले इंडिया हे शेअर्स वाढले. अदानी समुहातील शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले.

इरॉस इंटरनॅशनलचे शेअर्स गडगडले

इरॉस इंटरनॅशनल मीडिया लिमिटेडचे शेअर्स (Shares of Eros International Media) आज तब्बल १९.९२ टक्क्यांनी घसरले. गेल्या चार वर्षांतील इरॉसचे हे मोठे नुकसान आहे. बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने लेखा अनियमिततेमुळे कंपनी आणि त्यांच्या व्यवस्थापनावर कारवाई केल्यानंतर इरॉस शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. SEBI ने इरॉस इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक सुनील लुल्ला आणि कंपनीशी संबंधित तीन संस्थांना सिक्युरिटीज मार्केटमध्ये सहभाग घेण्यापासून प्रतिबंधित केले आहे.

आशियाई बाजारात घसरण

आशियाई बाजारात शुक्रवारी घसरण झाली. वाढती महागाई आणि मध्यवर्ती बँकांच्या व्याजदराबाबतच्या भूमिकांमुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. जपानमधील निक्केई १.८ टक्के घसरला. चीनचा शांघाय कंपोझिट १.३१ टक्के आणि हाँगकाँगचा हँग सेंग २.१ टक्के घसरला.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news