Stock Market Closing ‍Bell | शेअर बाजारात सलग तिसऱ्या सत्रांत तेजी, सेन्सेक्स २२९ अंकांनी वाढला, निफ्टी २१,४४० वर

Stock Market Closing ‍Bell | शेअर बाजारात सलग तिसऱ्या सत्रांत तेजी, सेन्सेक्स २२९ अंकांनी वाढला, निफ्टी २१,४४० वर

पुढारी ऑनलाईन : जागतिक संमिश्र संकेतांदरम्यान शेअर बाजारात आज मंगळवारी तेजी राहिली. सूस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीने रिकव्हरी करत हिरव्या चिन्हात व्यवहार केला. सेन्सेक्स २२९ अंकांनी वाढून ७१,३३६ वर बंद झाला. तर निफ्टी ९१ अंकांच्या वाढीसह २१,४४१ वर गेला. विशेष म्हणजे सेन्सेक्स सलग तिसऱ्या सत्रात वाढून बंद झाला. (Stock Market Closing ‍Bell)

बाजारातील रिकव्हरीला मेटल, फार्मा, ऑटो क्षेत्रामुळे सपोर्ट मिळाला. आयटी आणि रियल्टी वगळता पॉवर, ऑटो, ऑईल आणि गॅस, मेटल सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढून हिरव्या चिन्हात व्यवहार केला. संमिश्र जागतिक संकेतांदरम्यान बाजाराची सुरुवात सपाट झाली होती. पण सर्व क्षेत्रांतील खरेदीमुळे निफ्टी निर्देशांक संपूर्ण सत्रात २१,४०० वर राहण्यास मदत झाली आणि दिवसाच्या उच्च पातळीजवळ जाऊन तो बंद झाला.

संबंधित बातम्या 

महागाई कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करु शकते, या शक्यतेने आज शेअर बाजारात  तेजीचे वातावरण राहिले.

सेन्सेक्सवर काय स्थिती?

सेन्सेक्स आज ७१,०९७ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७१,४७१ पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर एनटीपीसी, विप्रो, एम अँड एम, टाटा स्टील, कोटक बँक, एशियन पेंट्स, पॉवर ग्रिड हे शेअर्स वाढले. तर बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स हे शेअर्स सर्वाधिक घसरले. इन्फोसिस, टीसीएस, टाटा मोटर्स हे शेअर्सही घसरले.

निफ्टीवरील टॉप गेनर्स

एनएसईवर निफ्टी ५० निर्देशांक आज २१,३६५ वर खुला झाला होता. त्यानंतर तो २१,४७७ पर्यंत वाढला. निफ्टीवर डिव्हिज लॅब, हिरो मोटोकॉर्प, एनटीपीसी, एम अँड एम, विप्रो हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. हे शेअर्स १.६६ ते ४.७८ टक्क्यांनी वाढले. तर बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, टीसीएस, टाटा मोटर्स हे शेअर्स घसरले. निफ्टी बँक ०.४९ टक्के वाढून ४७,७२४ वर तर निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस ०.३० टक्के वाढून २१,२६१ वर गेला. पण निफ्टी आयटीला फटका बसला.

इन्फोसिसला झटका

देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसचे (Infosys) शेअर्स आज मंगळवारी १.५ टक्क्यांनी घसरले. आज बाजारात एकूणच आयटी क्षेत्रातील शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसून आला. इन्फोसिसचा एका जागतिक कंपनीसोबत सामंजस्य करार (एमओयू) संपुष्टात आल्याच्या पार्श्वभूमीवर आज इन्फोसिसचे शेअर्स एनएसई निफ्टीवर १,५२३ रुपयांपर्यंत खाली आला. त्यानंतर हे शेअर्स १.१५ टक्के घसरणीसह १,५४४ रुपयांवर स्थिरावले. गेल्या सहा महिन्यांत इन्फोसिसचा शेअर्स सुमारे २२ टक्क्यांनी वाढला. गेल्या ५ वर्षांत त्यात सुमारे १३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. (Stock Market Closing ‍Bell)

कच्च्या तेलाच्या दरात वाढ

आज तेलाच्या किमती वाढल्या. यूएस फेडरल रिझर्व्ह लवकरच व्याजदरात कपात करण्यास सुरुवात करेल. यामुळे जागतिक अर्थव्यवस्था उभारी घेईल आणि इंधनाची मागणी वाढेल. या आशेने तेलाच्या किमती वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूड फ्यूचर्स ०.३ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ७९.३३ डॉलरवर पोहोचले. तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड ०.२ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरेल ७३.७२ डॉलरवर गेले. (Oil prices)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news