Gold Price Today | सोन्याच्या दरात मोठी तेजी, दर ६३ हजार पार, चांदी स्वस्त | पुढारी

Gold Price Today | सोन्याच्या दरात मोठी तेजी, दर ६३ हजार पार, चांदी स्वस्त

पुढारी ऑनलाईन : सोन्याच्या दरात मोठी तेजी आली आहे. सराफा बाजारात आज सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम दर ६३ हजार पार झाला. पण चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६३,०३१ रुपयांवर खुला झाला आहे. याआधीच्या सत्रात हा दर ६२,८४४ रुपयांवर बंद झाला होता. आज दरात १८७ रुपयांची वाढ झाली आहे. (Gold Price Today)

संबंधित बातम्या 

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६३,०३१ रुपये, २३ कॅरेट ६२,७७९ रुपये, २२ कॅरेट ५७,७३६ रुपये, १८ कॅरेट ४७,२७३ रुपये आणि १४ कॅरेट ३६,८७३ रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा दर प्रति किलो ७४,६९३ रुपयांवर आहे. याआधीच्या सत्रात हा दर प्रति किलो ७४,९१८ रुपये होता.

२०२३ वर्षात सोन्याच्या दरात सुमारे ८ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ६८ हजारांवरून आता ७४,९९३ रुपयांवर गेला आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर मंगळवारी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६३,१४९ रुपयांवर खुला झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस २,०६२.६० डॉलरवर आहे. (Gold Price Today)

शुद्ध सोने असे ओळखा?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

Back to top button