Stock Market Closing : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी मोठ्या व्याजदरवाढीचे संकेत दिले आहेत. याची गुंतवणूकदारांनी धास्ती घेतली आहे. याचे पडसाद आज आशियाई शेअर बाजारात उमटले. भारतीय शेअर बाजाराने आज (दि.८) घसरणीने सुरुवात केली होती. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) ३०० अंकांनी खाली आला होता. दुपारच्या सत्रात सेन्सेक्सने तोटा भरून काढला आणि तो १२३ अंकानी वधारुन ६०,३४८ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) ४२ अंकांच्या वाढीसह १७,७५४ वर स्थिरावला. आज सर्वच क्षेत्रात विक्रीचा जोर दिसून आला. रियल्टी आणि IT स्टॉक्समध्ये दबाव राहिला. तर अदानींच्या स्टॉक्समध्ये तेजी कायम राहिली आहे.
सेन्सेक्सवर सुरुवातीला टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इन्फोसिस, टायटन आणि कोटक बँक हे टॉप लूजर्स होते. हे शेअर्स १ ते १.५ टक्क्यांपर्यंत घसरले. इंडसइंड बँक, विप्रो, एशियन पेंट्स, टीसीएस आणि बजाज फिनसर्व्ह हे शेअर्सदेखील घसरले. तर मारुती, एल अँड टी आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. क्षेत्रीय निर्देशांकांत निफ्टी मेटल १.४७ टक्के घसरला, निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी रियल्टी हेदेखील घसरले. (Stock Market Opening)
बाजारात कमकुवत संकेत असतानाही अदानी समूहाच्या शेअर्सनी आज सलग सहाव्या सत्रांत तेजी नोंदवली. अदानींचे बहुतांश शेअर्स आज ग्रीन झोनमध्ये होते. अदानी ग्रीन, अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशन हे ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये राहिले. अदानी पॉवर हा ४ टक्क्यांपर्यंत वाढला. तर अदानी एंटरप्रायजेसने २.९० टक्क्यांने वाढून व्यवहार केला. यामुळे अदानी समूहाच्या १० शेअर्सच्या बाजार भांडवलात १७ हजार कोटींनी वाढ होऊन ते ९ लाख कोटींवर पोहोचले आहे. गेल्या ६ सत्रांत अदानी समूहातील शेअर्स गुंतवणूकदारांना २.२ लाख कोटींचा फायदा झाला आहे.
दुपारच्या सत्रात अदानी एंटरप्रायजेस (२.९० टक्के वाढ), एचडीएफसी बँक (०.०५ टक्के वाढ), रिलायन्स इंडस्ट्रीज (०.१३ टक्के वाढ), अदानी पोर्ट्स (२.८३ टक्के वाढ) हे ॲक्टिव्ह स्टॉक्स होते. (Stock Market Closing)
आशियाई शेअर्स आज घसरले. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ०.५ टक्के घसरून २८,४४ वर आला. दक्षिण कोरियाचा कोस्पी १.३ टक्के घसरून २,४३० वर आला. हाँककाँगचा हँग सेंग निर्देशांक २.३५ टक्क्यांनी घसरला. तर चीनचा शांघाय कंपोझिट निर्देशांक ०.०६ टक्क्यांने खाली आला.
फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या भूमिकेमुळे कच्च्या तेलाच्या दरात सलग दुसऱ्या दिवशीही घसरण झाली. ब्रेंट क्रूड फ्यूचर्स ०.३ टक्के कमी होऊन प्रति बॅरल ८३.०७ डॉलरवर आले.
हे ही वाचा :