Stock Market Closing | तेजीला ब्रेक! सेन्सेक्स सपाट, पण अदानी शेअर्सच्या गुंतवणूकदारांना फायदा

शेअर बाजार
शेअर बाजार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत असल्याने शेअर बाजारात मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात तेजी होती. पण बाजार बंद होताना या तेजीला ब्रेक लागला. सुरुवातीला वाढलेला सेन्सेक्स नंतर सपाट झाला. सेन्सेक्स आज १८ किरकोळ अंकांनी वाढून ६१,९८१ वर बंद झाला. तर निफ्टी ३३ अंकांनी वाढून १८,३४८ वर स्थिरावला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने सुमारे २०० हून अधिक अंकांनी वाढून ६२,१०० वर व्यवहार केला होता. तर निफ्टी १८,३०० वर राहिला. (Stock Market Closing)

बाजारातील तेजीत मेटल स्टॉक्स आघाडीवर राहिले. निफ्टी मेटल आज ३ टक्के वाढला. मेटल स्टॉक्समधील तेजीत APL Apollo Tubes, जिंदाल सॉ, टाटा स्टील, हिंदाल्को इंटस्ट्रीज हे आघाडीवर होते. ऑटो आणि फार्मा स्टॉक्समध्येही खरेदी दिसून आली. सेन्सेक्वर बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक हे शेअर्स वधारले. तर एचसीएल टेक, टेक महिंद्रा, कोटक बँक, एलटी, टायटन, सन फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल हे शेअर्स घसरले.

अदानींचे शेअर्स वधारले, बाजार भांडवलात १.८ लाख कोटींची वाढ

अदानी समुहाला सुप्रीम कोर्टाच्या तज्ज्ञ समितीकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर अदानी कंपन्यांचे शेअर्स वधारत आहेत. अदानी एंटरप्रायजेसचा (Adani Enterprises) शेअर आज टॉप गेनर राहिला. हा शेअर १३ टक्के वाढून २,६३३ रुपयांवर पोहोचला. अदानी पोर्ट्स (Adani Power), अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मर (Adani Wilmar), एसीसी, एनडीटीव्ही, अंबुजा सिमेंट हे अदानी समुहातील शेअर्सही वधारले. गेल्या ३ सत्रात अदानी समुहातील १० कंपन्यांच्या एकत्रित बाजार भांडवलात १.८ लाख कोटींची वाढ झाली आहे. अदानी प्रकरणाच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायमूर्ती ए. एम. सप्रे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमली होती. या समितीने अलीकडेच आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाला दिला होता. यानंतर अदानी समुहाला दिलासा मिळाला होता.

जाणून घ्या टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत

Telecom क्षेत्रातील ITI चा शेअर आघाडीवर होता. Vodafone Idea आणि Bharti Airtel हे शेअर्स घसरले. भारतातील अग्रगण्य व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने विजयानंद ट्रॅव्हल्सकडून ५० मॅग्ना बसेसची ऑर्डर मिळवली आहे. या पार्श्वभूमीवर टाटा मोटर्सचा (tata motors share price) शेअर १ टक्के वाढून ५२७ रुपयांवर पोहोचला. (Stock Market Closing)

जागतिक बाजारातील स्थिती

अमेरिकेतील नॅस्डॅक कंपोझिटने (Nasdaq Composite) सोमवारी नऊ महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर गाठली. तर S&P देखील वधारून बंद झाला. MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा व्यापक निर्देशांक ९ मे नंतरच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. हा निर्देशांक सुमारे ०.३ टक्के वाढला आहे. जपानच्या निक्केईने (Japan's Nikkei) नवव्या सत्रात तेजी कायम ठेवली. दरम्यान, गेल्या आठ सत्रांपैकी सात सत्रांमध्ये घसरलेला भारतीय रुपया आज सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत २ पैशांनी वाढून ८२.८२ वर पोहोचला.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news