सर्वच्या सर्व प्रमुख आणि क्षेत्रीय निर्देशांक रेड झोनमध्ये बंद होण्याची वेळ खूप, दिवसांनी बाजारात गत सप्ताहात आली. केवळ IT निर्देशांक याला अपवाद! तोही Flat म्हणावा. असा निफ्टी 2 टक्क्यांनी, बँक निफ्टी 2.35 टक्क्यांनी तर सेन्सेक्स 0.62 टक्क्यांनी घसरला. ( Stock Market )
संबंधित बातम्या
निफ्टी रिअॅल्टी सर्वाधिक म्हणजे साडेनऊ टक्के घसरला. सोभा, स्वान एनर्जी, मॅक्रोटेक डेव्हलपर्स हे शेअर्स साडे चौदा ते अठरा टक्के घसरले. गोदरोज प्रॉपर्टीज, डीएलएफ, प्रेस्टीज, इस्टेटस् हे शेअर्सही दहा टक्क्यांहून अधिक खाली गेले.
मॅक्रोटेक डेव्हलपर्सची गंमत तर अशी की 11 मार्च रोजी या कंपनीने टखझ द्वारा (Qualified Institutional Placement) 3300 कोटी रुपयांची निधी उभारणी केली म्हणून शेअरने सार्वकालीक उच्चांक नोंदवला (रु.1277.90) परंतु नंतरचे दोन दिवस नफा वसुलीमुळे शेअरमध्ये घसरण झाली. त्यात आणि कंपनीचे प्रवर्तक संभवनाथ इन्फ्राबिल्ड अँड फार्मस् यांनी 49.7 लाख शेअर्स सरासरी 1180.02 रु या भावाने विकले. अखेरीस शुक्रवारी हा शेअर रु. 1003.95 वर बंद झाला.
FIIS ची विक्री हळूहळू थंडावत आहे. सप्ताहात त्यांनी रु. 816.94 कोटींची निव्वळ विक्री केली. DIIS माल भरघोस खरेदी करत आहे. सप्ताहातील त्यांची निव्वळ खरेदी होती रु. 14147.54 कोटी! गत सप्ताहात निफ्टी स्मॉल कॅप आणि मिडकॅप इंडेक्स अनुक्रमे साडेपाच आणि साडेचार टक्के घरंगळले. कोरोनानंतरच्या रिकव्हरीमध्ये स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्सनी प्रचंड तेजी दर्शवली, त्यामुळे हे शेअर्स गुंतवणूकदारांचे TOP Picks होऊन बसले.
इतके की म्युच्युअल फंडस् कंपन्यांनी एकतर या प्रवर्गातील कित्येक नवीन फॅड बाजारात आणले किंवा अगोदरच असणार्या फंडांमधील स्मॉल कॅप आणि मिड कॅप अॅलोकेशनमध्ये वाढ केली. मागील पाच वर्षांच्या कालावधीत या फंडानी सरासरी 24 टक्के परतावा दिला; परंतु मागील एक महिन्यापासून या प्रवर्गामध्ये धोक्याची घंटी वाजू लागली आहे.
मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समधील गुंतवणुकीचा हा फुगा किती फुगावा? 2022 आणि 2023 या दोन वर्षांमध्ये स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंडांमध्ये रु. एक लाख कोटींहून अधिक गुंतवणूक झाली.
अखेरीस सेबीच्या प्रमुख श्रीमती मधाबी पुरी बूच यांनी स्मॉल कॅप आणि मिड कॅप संगमेंट निर्माण झाल्याबद्दल केलेले भाष्य आणि त्यामुळे स्मॉल आणि मिड कॅप शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. पाठोपाठ अॅम्फीनेही अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांना याबाबत पावले उचलण्यास सांगितले.
सोलार इंडस्ट्रीज (रु. 8855.50), लिंडे इंडिया (रु. 6441.10) आणि हेग (रु. 1882.15) हे शेअर्स आठवड्यात दहा टक्क्यांहून अधिक वधारले तर टाटा इन्व्हेस्ट हा शेअर साडेबावीस टक्के कोसळला. मागच्याच सप्ताहातील लेखात याच शेअरचे गुणगान गायिले होते; परंतु टाटा सन्स आयपीओ आणण्याची टाळाटाळ करीत आहे, अशी वदंता बाजारात पसरली आणि हा शेअर कोसळला. या आठवड्यात बाजार घसरण्याची तीन प्रमुख कारणे होती. त्यापैकी सेबीची स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्सबाबत व्यक्त झालेली चिंता हे एक कारण होते. त्याचा ऊहापोहवर केलाच आहे.
दुसरे कारण म्हणजे तोंडावर असलेल्या निवडणुका कोणत्याही देशाच्या मध्यवर्ती निवडणुका या त्या देशाच्या शेअर बाजारावर महत्त्वाचा परिणाम करतात. हे ओघानेच आले, कारण देशाचे वित्तीय धोरण, करप्रणाली या गोष्टी शेअर बाजाराची दिशा ठरविण्यात महत्त्वाच्या असतात; परंतु मागील 20 वर्षांचा किंवा चार निवडणुकांचा इतिहास पाहिला तर प्रत्येक निवडणुकीपूर्वी सहा महिने शेअर बाजाराने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. भारतासारख्या प्रचंड मोठ्या देशात आणि प्रचंड लोकसंख्या असणार्या खंडप्राय देशात तरी निवडणुका ही खूपच महत्त्वाची घटना ठरते. कारण शासनाचा भांडवली खर्च निवडणुकीपूर्वी खूप वाढतो.
भारतामध्ये ग्रामीण लोकसंख्या खूप असल्याने शेतीशी संबंधित सेक्टर्समध्ये गुंतवणूक वाढते आणि त्यामुळे (Consumption) ही खूप वाढते. आणि शेवटी तिसर्या आणि बाजाराच्या अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी बाजारात हाहाकार माजवलेल्या कारणाविषयी ! हे कारण म्हणजे इलेक्टोरल बाँडस् ! गुरुवारी सायंकाळी निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बाँडस्चा हा Pendora Box उघडला आणि एकच हलकल्लोळ माजला.
हा पेंडोरा बॉक्स अजून पुरवा उघडण्यात आलेला नाही. तो केवळ थोडासा किलकिला करण्यात आलेला आहे; परंतु सर्वोच्च न्यायालय SBI च्या मागे जणू काही दंडुका घेऊन लागली आहे. सोमवारी जेव्हा तो पूर्णपणे उघडला जाईल तेव्हा शेअर बाजार आणि भारताचे राजकीय क्षितीज, यांचे चित्र काय असेल? मात्र गुंतवणूकदारांनी अखंड आणि अति सावध राहावे. ( Stock Market )