Atal Bihari Vajpayee : ताऱ्याला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव, औरंगाबाद भाजपची अनोखी श्रद्धांजली

Atal Bihari Vajpayee : ताऱ्याला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव, औरंगाबाद भाजपची अनोखी श्रद्धांजली
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांचा जयंतीदिन देशभरात 'सुशासन दिन' म्हणून ओळखला जातो. दरम्यान, त्यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त औरंगाबाद शहर भाजपच्या वतीने तारामंडळातील एका ताऱ्याला अटल बिहारी वाजपेयी असे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. याबाबत www.space-registry.org या संकेतस्थळावर माहिती मिळू शकते. त्यासाठी संकेतस्थळावर registry key No – CX16408US टाकावा लागेल, अशी माहिती औरंगाबाद भाजप अध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिली.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी  (Atal Bihari Vajpayee) यांच्या नावाने अंतराळामध्ये एका ताऱ्याची नोंदणी केली आहे. हा तारा पूर्व दिशेला सकाळी प्रखरतेने दिसतो. याचे पृथ्वीपासूनचे अंतर 392.01 प्रकाश वर्षे आहे. हा तारा सूर्याच्या जवळ आहे. या तार्‍याची नोंदणी इंटरनॅशनल स्पेसवर केली आहे. या ताऱ्याचा रजिस्ट्री नंबर CX16408 US असा आहे. याच पद्धतीने भारतामधील कविवर्य कुसुमाग्रज यांच्या नावाने देखील आंतरराष्ट्रीय अंतराळामध्ये एका तार्‍याचे नामकरण झाले आहे.

दरम्यान, वाजपेयी 16 मे 1996 ते 1 जून 1996 आणि पुन्हा 19 मार्च 1998 ते 22 मे 2004 या कालावधीत पंतप्रधान होते. त्यांनी 1977 ते 1979 या काळात पंतप्रधान मोराजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणूनही काम केले आहे. 16 ऑगस्ट 2018 रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांचे निधन झाले. 2014 मध्ये सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी 25 डिसेंबर हा दिवस 'सुशासन दिन' म्हणून साजरा केला जाईल, असे जाहीर केले होते.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news