![ST bus discount : महिलांसाठी आनंदाची बातमी! आजपासून एस.टी. बसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F03%2FCopy-of-Copy-of-Copy-of-Copy-of-Copy-of-Untitled-Design.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचा सन 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना एसटी बसच्या प्रवासात तिकीट दरात 50 टक्के सवलतीची घोषणा केली होती. ही सवलत आजपासून (दि.१७) लागू करण्यात आली आहे. फडणवीस यांनी गुरुवारी (दि.9) अर्थसंकल्प मांडला होता. राज्यात सत्तेत येऊन शिंदे सरकारला जवळपास आठ महिने पूर्ण झाले. गेल्यावर्षी जूनअखेरीस सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. (ST bus discount)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मांडलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक महत्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली. त्यापैकी एसटी बसमध्ये प्रवास तिकीट दरात महिलांना 50 टक्के सवलतीची घोषणा करण्यात आली. हा निर्णय आजपासून (दि.१७) लागू करण्यात येत आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जाहीर केलेल्या परिपत्रकात म्हंटलं आहे की, महाराष्ट्र राज्याच्या सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये ५०% सवलत घोषित केली आहे. या घोषणेच्या अनुषंगाने दि. १७.०३.२०२३ पासून सर्व महिलांना राज्याच्या हद्दीपर्यंत म्हणजेच राज्यांतर्गत धावणा-या राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये ५०% सवलत लागू करण्यात येत आहे. सदर सवलतीची प्रतिपूर्ती शासनाकडून करण्यात येणार आहे.
सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ५०% सवलत लागू करणे बाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे.
हेही वाचा