SSC Result 2022 : धुळे जिल्ह्याचा निकाल 95.43 टक्के, मुलींनीच मारली बाजी

SSC Result 2022 : धुळे जिल्ह्याचा निकाल 95.43 टक्के, मुलींनीच मारली बाजी
Published on
Updated on

धुळे : पुढारी वृत्तसेवा

माध्यमिक शालान्त परीक्षेच्या आज ऑनलाइन लागलेल्या निकालात मुली पुन्हा वरचढ ठरल्या आहेत. धुळे जिल्ह्याचा 95.43 टक्के निकाल लागला असून जिल्ह्यात धुळे महानगरातून सर्वाधिक 96.66 टक्के निकाल लागला असून त्या खालोखाल शिरपूर तालुका वरचढ ठरला आहे. या तालुक्याचा 96.61 टक्के निकाल लागला आहे.

धुळे जिल्ह्यातून 28 हजार 334 विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. यात 15862 विद्यार्थी तर 12472 विद्यार्थिनींचा समावेश आहे. यातून 15605 विद्यार्थी तर 12305 विद्यार्थिनी अशा सत्तावीस हजार नऊशे दहा विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातून 26 हजार 635 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 14 हजार 784 विद्यार्थी तर 11 हजार 851 विद्यार्थिनींचा समावेश आहे. जिल्ह्यांमधून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 94.4 असून यात विद्यार्थिनींची टक्केवारी 96. 31 अशी आहे. त्यामुळे दहावीच्या निकालात यावर्षी देखील विद्यार्थीनीच वरचढ असल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यात धुळे महानगराचा सर्वाधिक 96. 66 टक्के निकाल लागला आहे. त्या खालोखाल शिरपूर तालुक्याचा सर्वाधिक 96.61 टक्के निकाल लागला आहे. या तालुक्यात देखील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनींची टक्केवारी 97.74 असून या तालुक्यातून 95. 74 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाली आहे. धुळे शहरातून 95.32 टक्के निकाल लागला असून साक्री मधून 93.82 टक्के शिंदखेडा तालुक्यातून 94. 97 टक्के तर धुळे महानगरातून 96. 66 टक्के निकाल लागला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news