Ranji Trophy : क्रीडामंत्री मनोज तिवारीने शतक ठोकून ‘तिच्यासाठी’ झळकावले ‘Love Letter’

Ranji Trophy : क्रीडामंत्री मनोज तिवारीने शतक ठोकून ‘तिच्यासाठी’ झळकावले ‘Love Letter’
Published on
Updated on

मुंबई : रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये पश्चिम बंगालचा संघ अडचणीत सापडला होता. त्यावेळी संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याची जबाबदारी राज्याचे क्रीडा मंत्री यांनी उचलली. मध्य प्रदेशविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात मनोज तिवारी यांनी शतक झळकावले.

रणजीमध्ये शतक झळकावल्याने बंगालचे क्रीडा मंत्री मनोज तिवारी पुन्हा चर्चेत आले आहेत. शतकापेक्षा त्यांनी मैदानात जे प्रेमपत्र झळकावलं त्यामुळे ते अधिक चर्चेत आले आहे. सध्या ते प्रेमपत्र खूपच वायरल होत आहे. या पत्रावर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तर काही जण त्यांना ट्रोल करत आहेत. तसेच अनेकांनी त्यांच्या या रोमँटिक अवताराचे कौतुक केले आहे.

हा सामना बंगळुरूच्या अलूर क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळवला गेला. या सामन्यात शतक झळकावल्यानंतर त्यांनी मैदानावर ते पत्र खिशातून काढले व सर्वासमाेर दाखवले. त्या पत्रात त्यांनी कुटुबियांसाठी Love असे लिहिले होते. त्या पत्रात सर्वात वरती Susmita असे लिहिले होते. सुष्मिता रॉय हि त्याची पत्नी आहे. त्या पत्रामध्ये मुलाबद्धल सुद्धा लिहले होते.

बायको सुष्मिता रॉय मुलांबद्दल प्रेम व्यक्त (Ranji Trophy)

पश्चिम बंगालचा मध्य प्रदेश विरुद्ध रणजी सामना सुरु आहे. शतक झळकावल्यानंतर त्यांनी खिशातून पत्र बाहेर काढले व त्या पत्रामध्ये आपल्या पत्नी-मुलांबद्दल प्रेम व्यक्त केले हाेते. मनोज तिवारींची बायको सुष्मिता रॉय फक्त सुंदरच नाही, तर सोशल मीडियावरही ती ॲक्टीव्ह असते. एका कॉमन मित्रामार्फत दोघे भेटले होते. दोघांनी सात वर्ष डेट केल्यानंतर लग्न केलं होतं.

मनोज तिवारीने २०१३ मध्ये लग्न केलं

मनोज तिवारी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी २०१३ मध्ये सुष्मिता रॉयसोबत लग्न केले. दोघांनी लग्नाआधी जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केले होते. सुष्मिता या अनेकवेळा मैदानावर तिवारी यांच्यासाठी चीअर करताना दिसल्या आहेत. सुष्मिता सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असल्या तरी त्या अनेक अभिनेत्रींना टक्कर देऊ शकतात.

संघ अडचणीत असताना मनोज तिवारी यांनी घेतली जबाबदारी (Ranji Trophy)

बंगालची अवस्था ५ बाद ५४ अशी झाली असताना मनोज तिवारी व शाहबाज अहमद यांनी वैयक्तिक शतक झळकावले. तिवारी व शाहबाज यांनी सहाव्या विकेटसाठी १८३ धावांची भागीदारी केली. मनोज यांनी २११ चेंडूंत १२ चौकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या. शाहबाजने २०९ चेंडूंत १२ चौकारांसह ११६ धावा केल्या. ही दोघं माघारी परतल्यानंतर बंगालचा डाव गडगडला. त्यांनंतर त्यांचा पहिला डाव २७३ आटाेपला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news