SpiceJet : स्पाईसजेट विमानात प्रवाशाने काढले एअरहोस्टेस आणि सहप्रवासी महिलांचे आक्षेपार्ह ‘फोटो’

SpiceJet
SpiceJet

पुढारी ऑनलाइन डेस्क : SpiceJet : स्पाईसजेट विमानात एका प्रवाशाने एअरहोस्टेससह सहप्रवासी महिलांचे आक्षेपार्ह फोटो काढले. ही घटना 2 ऑगस्टला दिल्ली-मुंबई विमान उड्डाणा दरम्यान घडली. केबिन क्रूने याचा विरोध केल्यानंतर संबंधीत आरोपीने आपल्या फोनमधून पिक्चर्स डिलिट केले तसेच माफी ही मागितली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली महिला आयोगााने स्वतः संज्ञानात घेऊन कारवाई सुरू केली आहे.

स्पाइसजेट (SpiceJet) एयरलाइन प्रवक्ताने दिलेल्या माहितीनुसार, स्पाइसजेटच्या विमान क्रमांक एसजी 157 बुधवारी (2 ऑगस्ट) दिल्लीहून-मुंबईला निघाले होते. या उड्डाणात पहिल्या रांगेत बसलेल्या एका प्रवाशाने केबिन क्रू सदस्यांची छायाचित्रे काढली. सोबतच अन्य सहप्रवासी महिलांची छायाचित्रेही घेतली. ही गोष्ट केबिन क्रू सदस्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला विरोध केला आणि असे करण्यापासून रोखले. स्पाइस जेटने या घटनेची पुष्टि करत सांगितले की नंतर या प्रवाशाने त्याने काढलेले सर्व पिक्चर्स डिलिट केले आणि माफी मागितली. तसेच त्याच्याकडून लेखी माफीनामा देखिल घेण्यात आला.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओवरून दिल्ली महिला आयोगाने स्वतः ही घटना संज्ञानात घेतली. आयोगाने सांगितले की व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपी प्रवासी 'महिला फ्लाइट अटेंडंट' आणि महिला सहप्रवासी यांचे फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच त्याचा मोबाईल फोन तपासला असता त्याच्या फोनमधून फ्लाइटमधील महिलांची आक्षेपार्ह छायाचित्रे आढळून आली.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, विमानात लैंगिक छळाच्या तक्रारी वाढत आहेत. हे अस्वीकार्य आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा झाली पाहिजे. DGCA ने विमानातील लैंगिक छळाच्या विरोधात शून्य सहिष्णुता धोरण ठेवले पाहिजे. (SpiceJet)

दिल्ली महिला आयोगाने याप्रकरणी दिल्ली पोलीस, IGI विमानतळ आणि DGCA यांना नोटीस बजावली आहे. आयोगाने आरोपींच्या अटकेसह एफआयआरचा तपशील मागवला आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news