Vistara Flight Bomb Threat : दिल्ली विमानतळावर विस्ताराच्या दिल्ली-पुणे विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी

Vistara Flight
Vistara Flight
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Vistara Flight Bomb Threat : दिल्ली विमानतळावर दिल्ली-पुणे विस्तारा विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.18) ही धमकी देण्यात आली आहे. दरम्यान दिल्ली विमानतळावर आयसोलेशन बे मध्ये विमानाची तपासणी सुरू आहे. सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह सुखरूप खाली उतरवण्यात आले आहे. विमानात बॉम्ब असल्याचा कॉल आज जीएमआर कॉल सेंटरला आला होता.

राजधानी दिल्लीवरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्यानंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकच खळबळ उडाली. तात्काळ विमानाला सुरक्षा तपासणीसाठी विलगिकरणात नेण्यात आले. सर्व प्रवाशांना सुखरूपरित्या विमानातून खाली उतरवण्यात आले. शुक्रवारी सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी जीएमआर कॉल सेंटरवर दिल्लीवरून पुण्याला उड्डाण घेणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा कॉल आल्यानंतर सुरक्षा एजेन्सी सतर्क झाल्या.

सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विस्तारा एअर लाईनचे 'यूके-९७१' हे विमान दिल्लीच्या आयजीआय विमानतळावरून पुण्याच्या दिशेने उड्डाणासाठी तयार असतानाच गुरूग्राम येथील जीएमआर कॉल सेंटरमध्ये या विमानात बॉम्ब असल्याची सूचना मिळाली. विमानातून १०० हून अधिक प्रवासी प्रवास करीत होते.

सर्व प्रवाशांना विमानाबाहेर सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा ऐजन्सींनी निरीक्षणासाठी विमानाला तात्काळ आयसोलेशन बे मध्ये नेले.तपासणी दरम्यान विमानात कुठलीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, अशी माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news