कुत्र्यासाठी विमानातील तीन सीट केल्या बूक! | पुढारी

कुत्र्यासाठी विमानातील तीन सीट केल्या बूक!

वॉशिंग्टन : काही ‘समर्थाघरचे श्वान’ पाहिले की ‘हर कुत्ते का एक दिन आता है’ या म्हणीची सार्थकता पटते! पाश्चात्त्य देशांमध्ये तर कुत्र्यांचे भलतेच लाड केले जात असतात. कुणी कुणी तर आपली संपत्तीही कुत्र्यांच्या नावे करून ठेवलेली आहे. आता अमेरिकेतील पाळीव श्वानाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका तरुणाने आपल्या श्वानासाठी फ्लाईटमधील तीन सीट बूक केल्या होत्या!

23 वर्षांचा गॅब्रिएल बोगनर याने आपला पाळीव कुत्रा ‘डार्विन : द ग्रेट डेन’ याच्यासमवेत अमेरिकन एअरलाईन्सच्या फ्लाईटमध्ये लॉस एंजिल्स ते न्यूयॉर्कपर्यंतचा प्रवास केला. ग्रेट डेन प्रजातीचा हा उंच कुत्रा आरामात या तीन सीटवर बसलेला होता. त्याला पाहून प्रवासीही चकीत होत होते. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. हा डॉगी विमानात चढत असताना यामध्ये दिसतो. यावेळी तो कॉकपिटही न्याहाळून पाहतो. त्याच्या समोरच्या रोमध्ये कोण बसले आहे हेही तो पाहू लागतो. आजुबाजूच्या लोकांना त्याचे हावभाव पाहून गंमत वाटत होती. बोगनरने सांगितले की डार्विन विमानातील सर्वात मोठ्या कार्गो बॉक्समध्येही फिट बसू शकत नाही. त्यामुळे त्याच्यासाठी संपूर्ण रोचेच तिकीट घेतले होते जेणेकरून त्याचा हा प्रवास आरामात होईल.

Back to top button