South Africa Team : वर्ल्डकप संघाची घोषणा होताच ‘या’ डावखु-या फलंदाजाने जाहीर केली निवृत्ती

South Africa Team : वर्ल्डकप संघाची घोषणा होताच ‘या’ डावखु-या फलंदाजाने जाहीर केली निवृत्ती
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : South Africa Team : दक्षिण आफ्रिकेने (south africa) अगामी आयसीसी वनडे विश्वचषकसाठी (ICC ODI World Cup) 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. दरम्यान, एक धक्कादायक बातमीही समोर आली आहे. द. आफ्रिकेचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज आणि माजी कर्णधार क्विंटन डी कॉक (quinton de kock) याने विश्वचषक संघात स्थान मिळूनही निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर हा 30 वर्षीय खेळाडू वनडे फॉर्मेटला अलविदा करणार आहे.

'केवळ टी-20 खेळायचे आहे'

डी कॉकला (quinton de kock) केवळ टी-20 क्रिकेट आणि फ्रँचायझी क्रिकेट खेळण्यावर लक्ष केंदीत करायचे आहे. त्यामुळे त्याने वनडे मधूनही निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने यापूर्वी कसोटी क्रिकेटलाही बाय-बाय केले आहे.

डी कॉकचे वनडे करिअर (quinton de kock)

डिकॉकने वनडे क्रिकेटमधील पहिला सामना 2013 मध्ये न्यूझीलंड क्रिकेट संघाविरुद्ध खेळला. त्याने आतापर्यंत 140 वनडे सामने खेळले असून 44.85 च्या सरासरीने 5,966 धावा केल्या आहेत. 178 च्या सर्वोत्तम स्कोअरसह त्याने 17 शतके आणि 29 अर्धशतके झळकावली आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 96.08 आहे. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7 वेळा नाबाद राहिला आहे. त्याने वनडेमध्ये 687 चौकार आणि 93 षटकारही मारले आहेत.

विश्वचषक स्पर्धेसाठी द. आफ्रिकेचा संघ

वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी द. आफ्रिका क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. टेंबा बावुमाच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. संघात एका युवा गोलंदाजाचा आश्चर्यकारक समावेश करण्यात आला आहे. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झी यालाही संघात स्थान देण्यात आले आहे. त्याने या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो आतापर्यंत फक्त 2 आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळला असून त्याला 5 विकेट घेण्यात यश आले आहे.

केशव महाराज, शम्सीवर फिरकीची जबाबदारी

याशिवाय संघात यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर आणि रॅसी व्हॅन डर डुसेन या अनुभवी फलंदाजांचाही समावेश आहे. वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व कागिसो रबाडा करेल आणि इतर वेगवान गोलंदाज अॅनरिक नोर्टजे आणि लुंगी एनगिडी त्याला साथ देताना दिसतील. यंदाचा विश्वचषक भारतात होणार आहे. हे पाहता दक्षिण आफ्रिकेने आपल्या संघातील फिरकी गोलंदाजीची जबाबदारी केशव महाराज आणि तबरेझ शम्सी यांच्यावर सोपवली आहे.

श्रीलंकेविरुद्ध विश्वचषक मोहिमेला सुरुवात

द. आफ्रिका 7 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध विश्वचषक मोहिमेला सुरुवात करेल. याआधी त्यांना 29 सप्टेंबरला अफगाणिस्तान आणि 2 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध सराव सामने खेळायचे आहेत.

युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसला वगळले

ट्रिस्टन स्टब्स आणि डेवाल्ड ब्रेविस या युवा फलंदाजांची विश्वचषक संघात निवड झालेली नाही. या दोघांची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली होती, मात्र दोघांनाही विश्वचषक संघात स्थान मिळू शकले नाही. याशिवाय व्हॅन पारनेलही संघाचा भाग नाही.

विश्वचषक स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेचा 15 सदस्यीय संघ :

टेम्बा बावुमा (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सेन, हेनरिक क्लासेन, सिसांडा मागाला, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी नॉरिच, अॅनरिक नोर्टजे, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी आणि रॅसी व्हॅन डर डुसेन.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news