INDvsSA Test : तिस-या कसोटीपूर्वी डीन एल्गराचा भारताला इशारा, म्हणाला..

INDvsSA Test : डीन एल्गराचा भारताला इशारा
INDvsSA Test : डीन एल्गराचा भारताला इशारा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना (IND vs SA 3rd test) मंगळवारपासून (दि. ११) केपटाऊनमध्ये (Cape Town Test) सुरू होत आहे. या सामन्यापूर्वी आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने भारतीय संघाला इशारा दिला आहे. एल्गर म्हणाला की, टीम इंडियाने केपटाऊनमध्ये वेगवान आणि उसळणा-या चेंडूंचा सामना करण्यासाठी सज्ज असले पाहिजे. (INDvsSA Test)

एल्गरने स्थानिक मीडियाला मुलाखत देताना म्हटले की, 'मला वाटते की तिसरी कसोटी आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. जोहान्सबर्गमध्ये आम्ही जसा खेळ केला तसा खेळ करत राहिल्यास आम्ही तिसरी कसोटी जिंकू. गोलंदाजीतील 'वेग' हा आमचा प्रिय मित्र असेल. जोहान्सबर्गमधील सामन्यात बॅटने कशी खेळी साकारायची याचे मला अगदी शाळकरी असल्यापासून आकर्षण होते. तेच मी जोहान्सबर्ग कसोटीत केले आणि विजय साकारला. माझ्यासाठी शतक पूर्णे करणे महत्त्वाचे नव्हते. संघाला विजयी करणे हेच माझे ध्येय होते. यात मी यशस्वी झालो. (INDvsSA Test)

एल्गर पुढे म्हणाला, 'मला नेहमीच पुढे होवून नेतृत्व करायचे होते. बाकीच्या व्यक्तींना तुमच्या पावलावर पाऊल ठेवणं आणि तुम्ही चेंज-रूममध्ये काय म्हणत आहात त्यावर विश्वास ठेवणं खूप सोपं झालं. वैयक्तिक खेळीपेक्षा विजयात मोठे योगदान देणे महत्त्वाचे असते. शेवटच्या कसोटीतही जोहान्सबर्ग कसोटीतील खेळी प्रमाणे एक डाव खेळायला मिळेल अशी अपेक्षा करतो.

केपटाऊनचे न्यूलँड्स मैदान हे टेबल माउंटनने झाकलेले वेगवान गोलंदाजांसाठी नंदनवन आहे. त्यामुळेच अंतिम कसोटीत दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज भारतीय फलंदाजांना नक्कीच अडचणीत आणतील, असा एल्गरला विश्वास आहे. तसेस केपटाऊन कसोटी सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहपासून आफ्रिकन फलंदाजांनाही सावध राहावे लागेल. (INDvsSA Test)

भारताने केपटाऊनमध्ये आतापर्यंत ५ कसोटी सामने खेळले आहेत. मात्र टीम इंडियाला एकही विजय मिळवता आलेला नाही. या मैदानावर भारताला तीन वेळा पराभवाला सामोरे जावे लागले आहे, तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. या मैदानावर दोन्ही देशांदरम्यान झालेल्या ५ कसोटी सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजांनी १२४ बळी घेतले आहेत. तर २०११ च्या कसोटीत हरभजन सिंगने दुसऱ्या डावात ७ विकेट घेतल्या होत्या. या मैदानावर फिरकीपटूंनी केवळ ३४ विकेट्स घेतल्या आहेत. (INDvsSA Test)

केपटाऊनच्या मैदानावरील द. आफ्रिका विरुद्ध भारत रेकॉर्ड…

१९९३ मधील सामना अनिर्णित
१९९७ मधील सामन्यात द. आफ्रिकेचा २८२ धावांनी विजय
२००७ मधील सामन्यात द. आफ्रिक्रेचा ५ विकेट्स राखून विजय
२०११ मधील सामना अनिर्णित
२०१८ मधील सामन्यात द. आफ्रिकेचा ७२ धावांनी विजय

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news