पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या मकर संक्रात आणि भोगीच्या निमित्ताने म्हणजे, १२ जानेवारील रोजी साऊथ आणि बॉलिवूडमधील अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहे. यात धमाकेदार 'मेरी ख्रिसमस', 'हनुमान', 'गुंटूर करम', 'आयलन' आणि 'कॅप्टन मिलर' या चित्रपटाचा समावेश आहे. दरम्यान रिलीज झाल्यानंतर सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहेत. मात्र, साऊथ अभिनेता धनुषच्या 'कॅप्टन मिलर' चित्रपटाची चाहत्यांमध्ये खूपच क्रेझ पाहायला मिळत आहे. हा चित्रपट दररोज बॉक्स ऑफिसवर धमारकेदार कमाईचे आकडे समोर येत आहेत. ( Captain Miller collection )
संबंधित बातम्या
मिळालेल्या माहितीनुसार, साऊथ अभिनेता धनुषच्या 'कॅप्टन मिलर' हा चित्रपट येत्या १२ जानेवारी २०२४ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजे, शुक्रवारी ८.७ कोटींची भरघोष अशी कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे, शनिवारी चित्रपटाने ६.७५ कोटी रुपयांची कमाई केली. दरम्यान एकूणच बॉक्स ऑफिसवर १५. ४५ कोंटीचे कलेक्शन झाले आहे. तर रविवारच्या आकडेवारीची अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, यात वाढ होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे अभिनेता महेश बाबू यांचा 'गुंटूर करम', साऊथ स्टार विजय सेतुपती आणि बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफचा 'मेरी ख्रिसमस' आणि अभिनेता तेजा सज्जाचा 'हनुमान' या चित्रपटांना 'कॅप्टन मिलर' टक्कर देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'गुंटूर कारम'ने पहिल्या दिवशी ४१.३ कोटी रुपयांची कमाई करून ओपनिंग केलं. 'मेरी ख्रिसमस'ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी २. ५५ कोटी आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी ३. ५० कोटीची कमाई केली. तर 'हनुमान' चित्रपटाने पहिल्या दिवशी शुक्रवारी ८. ०५ कोटी आणि शनिवारी १२. ५३ कोटी रुपयांचा कमाई केली.
'कॅप्टन मिलर' हा एक अॅक्शन चित्रपट आहे. धनुषसोबत या चित्रपटात अभिनेत्री प्रियांका मोहन, शिवा राजकुमार, निवेदिता सतीश या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली आहे. 'कॅप्टन मिलर' जगभरातील १६०० हून अधिक स्क्रीनवर रिलीज झाला आहे. चित्रपटाची निर्मिती सत्य ज्योती फिल्म्सने केली आहे. तर चित्रपटाला जीव्ही प्रकाश कुमार यांचे संगीत लाभले आहे. चित्रपटाची कथा १९३० च्या दशकावर आधारित आहे. चित्रपटातील धनुषच्या पात्राचे नाव ;कॅप्टन मिलर; आहे. ( Captain Miller collection )