Sonu Sood : सोनूने आगामी चित्रपटात दिली ‘या’ मुलाला संधी!

सोनू सूद
सोनू सूद

पुढारी ऑनलाईन : नेहमीच सगळ्यांना मदत करण्यासाठी तत्पर असलेला अभिनेता म्हणून सोनू सूदला ( Sonu Sood ) ओळखले जाते. लोकांच्या मदतीसाठी आजवर सोनूने अनेक काम केली आहेत. सोनू सध्या रोडीजचा नवीन सीझन होस्ट करत आहे. दरम्यान सोनूने एका बधीर असणाऱ्या मुलाला 'फतेह' चित्रपटाची ऑफर दिली आहे.

रोडीज सीझन १९ च्या ऑडिशन्स दरम्यान, सोनू सूदला गाझियाबाद, उत्तर प्रदेश येथील शुभम नावाचा एक स्पर्धक भेटला. हा शुभम कानाने बधीर आहे. सोनूने ( Sonu Sood )  त्याच्या दृढनिश्चयाने आणि चिकाटीने प्रभावित होवून एक उल्लेखनीय काम करून या तरुण मुलाचे स्वप्न साकार केले आहे. त्याला त्याच्या होम प्रॉडक्शनमधील 'फतेह' मध्ये एक खास भूमिका ऑफर केली आहे.

रोडीजमध्ये नेहमीच कठोर आणि शिस्तबद्ध व्यक्तिमत्व म्हणून सोनू पुन्हा चर्चेत आला आहे. पण त्याने या गोष्टीने सगळ्यांची मने जिंकली आहेत. अशा एका मुलाला कामाची संधी देऊन त्याने त्याची अनोखी बाजू दाखविली आहे. हा शो नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.

शुभमने प्रामाणिकपणाने अभिनेता बनण्याची इच्छा सोनूला बोलून दाखविली आणि त्यांने लगेचच या गोष्टीचा विचार केला. समाजाच्या भल्यासाठी नेहमीच हातभार लावणाऱ्या लोकांना अशा संधी उपलब्ध करून देण्यास सोनूने कोणतीही कसर सोडत नाही असे दिसून येत आहे. यामुळे सोनू सगळ्यांची मने जिंकली आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news