पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सोनू सूदने अलीकडेच त्याच्या आगामी चित्रपट फतेहच्या सेटवरील काही खास आणि तितक्याच मजेदार बीटीएस फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोची तुफान चर्चा झाली. याचे कारण देखील तितकेच छान आहे. (Fateh movie) एक विशेष सह-कलाकार आहे या चित्रपटात सोनू सोबत दिसणार आहे ती म्हणजे अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस! (Fateh movie)
सोनू सूदने शेअर केलेले BTS 'फतेह' च्या सेटवरील अनेक गोष्टींची खास झलक देतात. सोनूने त्याच्या पोस्टला हटके कॅप्शन दिली. "कधीकधी काही विद्यार्थी इतके लवकर शिकणारे असतात @jacquelinefernandez शेवटी मला माझ्या पुढच्या चित्रपटासाठी DOP सापडला. @ilcondor तुझी नोकरी धोक्यात आहे #fateh @vedish_naidu_photography"
या फोटोंमधून सेटवर किती धमाल मजेदार वातावरण असत हे कळतंय. या फोटोंमधून फक्त कलाकारांची मज्जा हायलाईट होत नाही तर कलाकार आणि क्रू यांच्यातील अनोखं नातं यातून दिसतं. जशी जशी या चित्रपटाची उत्कंठा वाढत चालली आहे तसतसे प्रेक्षक "फतेह" च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. सोनूच्या नव्या सिनेमाची जादू अनुभवण्यासाठी उत्सुक आहेत.
'फतेह' हा सोनू सूदचा आणि झी स्टुडिओसह होम प्रोडक्शन चा चित्रपट आहे. ज्यामध्ये सोनू सूद आणि जॅकलीन फर्नांडिस हे मुख्य कलाकार आहेत. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.