अजित पवारांच्या बंडानंतर सोनिया गांधी यांची शरद पवारांशी चर्चा

शरद पवार
शरद पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करून रविवारी (दि.२) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता हे फक्त शिंदे-फडणवीस सरकार राहिले नसून शिंदे-फडणवीस-अजित पवार यांचे सरकार झाले आहे. दरम्यान, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी अजित पवार यांच्या बंडाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे.

सोनिया गांधी यांनी शरद पवारांना पाठिंबा दर्शवला आहे. सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे. मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनीही शरद पवार यांच्याशी चर्चा केली. अजित पवार यांच्या कृतीला आमचा पाठींबा नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news