सोलापूर : माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंचा अजित पवारांना पाठिंबा | MLA Support Ajit Pawar

सोलापूर : माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंचा अजित पवारांना पाठिंबा | MLA Support Ajit Pawar

माढा; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माढ्याचे आ. बबनराव शिंदे हे अजित पवार यांचे सोबत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील राजकीय भूकंपानंतर त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे सध्या मी मुंबईत आहे. मी अजितदादा यांच्या बरोबर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद मी पाहिली नसल्याचेही आमदार बबनराव शिंदे यांनी यावेळी सांगितले. अजितदादांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण निमगाव येथे घरी असुन या राजकीय घडामोडींवर कसलेही भाष्य करावयाचे नाही असे सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news