सोनाली फोगाट मृत्यू प्रकरण : दोघा संशयितांना १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी

सोनाली फोगाट
सोनाली फोगाट

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा : अभिनेत्री तथा भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या संशयित मृत्यू प्रकरणी अटकेत असलेला तिचा स्वीय सहायक सुधीर सांगवान व मित्र सुखविंदर सिंग यांना आज (दि.१०) पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

सोनाली फोगाट यांचा हणजूण येथील एका हॉटेलात मृत्यू झाला होता. त्यानंतर गोव्यात आलेल्या तिच्या भावाने व नातेवाईकांनी सोनाली यांना सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग यांनी मारल्याचा आरोप केल्यानंतर हणजूण पोलिसांनी त्या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करून अटक केली होती. पहिल्यांदा त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर ४ दिवसांची पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली होती. १४ दिवसांची पोलीस कोठडी झाल्यानंतर आता त्यांना १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, हणजूणच्या ज्या कर्लीस बारमध्ये सोनाली फोगाट यांना जबरदस्तीने अमली पदार्थ पाजण्यात आले होते. दरम्यान, वादग्रस्त कर्लीस बारचे बेकायदेशीर बांधकाम जीसीझेडएमएच्या आदेशानंतर जमीनदोस्त करण्याचे काम दुसऱ्या दिवशीही सुरू होते.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news