पुढारी ऑनलाईन : भीषण रेल्वे अपघाताची घटना ताजी असतानाच ओडिशात (Odisha) सोमवारी आणखी एक अपघात झाला. ओडिशातील डुंगुरी येथून बारगढकडे जाणारी मालगाडी सोमवारी सकाळी रुळावरून घसरली. बारगढ जिल्ह्यातील सांबरधाराजवळ चुनखडी वाहून नेणाऱ्या मालगाडीच्या अनेक वॅगन्स रुळावरून घसरल्या. ओडिशात २७५ जणांचा बळी गेलेल्या भीषण अपघातानंतर अवघ्या तीन दिवसानंतर ही घटना घडली आहे. (Odisha train accident)
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासाला सुरुवात केली आहे. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ईस्ट कोस्ट रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ओडिशातील बारगढ जिल्ह्यातील मेंधापलीजवळ एका खासगी सिमेंट कारखान्याकडून चालवण्यात आलेल्या मालगाडीच्या काही वॅगन्स कारखान्याच्या आवारात रुळावरून घसरल्या. या प्रकरणी रेल्वेचा कसलाही संबंध नाही. रोलिंग स्टॉक, इंजिन, वॅगन्स, ट्रेन ट्रॅक्स (नॅरो गेज) यासह सर्व पायाभूत सुविधांची देखभाल खासगी सिमेंट कंपनी करत आहे आणि त्याचा भारतीय रेल्वे व्यवस्थेशी कोणताही संबंध नाही.
देशातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघातांपैकी एक बालासोर जिल्ह्यात एकामागून एक तीन गाड्यांचा अपघात झाला. बंगळूर-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीचा समावेश असलेला हा अपघात कोलकात्याच्या दक्षिणेस सुमारे २५० किमी आणि भुवनेश्वरच्या १७० किमी उत्तरेस बहनगा बाजार स्टेशनजवळ शुक्रवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास झाला होता. या दुर्घटनेत २७५ जणांचा मृत्यू आणि १,१०० लोक जखमी झाले आहेत. यातील १०० जणांचा प्रकृती गंभीर आहे. ओडिशातील रेल्वे दुर्घटनेला तांत्रिक बिघाड हेच कारण असून कारणाचा शोध लागला आहे. अंतिम अहवाल आल्यावर पुढील कारवाई होईल, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे. (Odisha train crash)
हे ही वाचा :