सोलापूर विद्यापीठ पदवी-पदविका प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्जास प्रारंभ

सोलापूर विद्यापीठ पदवी-पदविका प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्जास प्रारंभ

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा १८ वा दीक्षांत समारंभ होणार आहे. यामध्ये पदवी-पदविका प्रमाणपत्रासाठी 3 ऑक्टोबरपासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहे, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

पदवी प्रमाणपत्रासाठी अशी असेल फी

पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईल अर्ज करताना जे विद्यार्थी 2017 ते 2021 दरम्यान उत्तीर्ण आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी 600 रुपये शुल्क आहे. तर मे 2005 ते डिसेंबर 2016 मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 900 रुपये शुल्क आहे. तसेच 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत आहे. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची साक्षांकित प्रत 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत विद्यापीठात जमा करावयाचे आहे, असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

असा कराल अर्ज

विद्यार्थांनी ऑनलाईन अर्ज करताना su.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर student login करून convocation यावर अर्ज करावयाचा आहे. दीक्षांत समारंभाची तारीख व वेळ विद्यापीठ नंतर जाहीर केली जाणार  आहे. तसेच याबाबत विद्यार्थ्यांना एसएमएस व ईमेलद्वारे आणि विद्यापीठाच्या संकेतस्थळावर माहिती देण्यात येणार आहे.

ऑनलाईन फॉर्म भरताना काही अडचण आल्यास convocation@sus.ac.in या इमेलवर विद्यार्थी संपर्क करावा. पदवी प्रमाणपत्राचे शुल्क ज्या विद्यार्थ्यांनी अंतिम सत्राचा परीक्षा फॉर्म भरताना अदा केले आहे, अशा विद्यार्थ्यांना आता शुल्‍क भरण्याची आवश्यकता नाही. तर उर्वरित विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news