Sambhaji Bhide Controversy : भिडे गुरूजींच्या समर्थनार्थ आंदोलन; पोलिसांचा धारकर्‍यांवर लाठीचार्ज

Sambhaji Bhide Controversy : भिडे गुरूजींच्या समर्थनार्थ आंदोलन; पोलिसांचा धारकर्‍यांवर लाठीचार्ज

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर शहरातील शिवाजी चौकात शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजींच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यासाठी आज (दि.२) धारकरी एकत्र आले होते. त्यावेळी फौजदार चावडी पोलिसांनी धारकर्‍यांना ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणले. यावेळी ताब्यात घेतलेल्या धारकर्‍यांना सोडविण्यासाठी फौजदार चावडी पोलिस ठाण्यासमोर जवळपास 300 जण जमले होते. यावेळी धारकरी व पोलिस यांच्यात बाचाबाची झाली. पोलिसांनी धारकर्‍यांवर लाठीचार्ज केला. १२ धारकर्‍यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. (Sambhaji Bhide Controversy)

आज सायंकाळी चारच्या सुमारास भिडे गुरूजींच्या समर्थनार्थ काही धारकरी जमले व त्यांनी आंदोलन सुरू केले. याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी काही धारकरी पुना नाका येथील संभाजी चौकात गेले. तेथे धारकर्‍यांनी भिडे गुरूजींच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन फौजदार चावडी पोलिस ठाण्यात नेले. याची माहिती समजताच जवळपास ३०० धारकरी पोलिस ठाण्यासमोर जमले. पोलिसांनी जमाव जमवू नका, असे सांगितले. धारकरी व पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी काही धारकर्‍यांनी चॅनलवाल्यांना मुलाखती दिल्या. त्यानंतर घोषणा देण्यास सुरूवात केली. यावेळी पोलिसांनी पुन्हा त्यांना पोलिस ठाण्यासमोर घोषणा देवू नका, असे सांगितले. त्यावेळी धारकरी मोठ्याने घोषणा देवू लागले. जमाव जास्तच वाढू लागला. परिणामी पोलिसांनी धारकऱ्यांवर लाठीचार्ज केला. (Sambhaji Bhide Controversy)

भिडे गुरूजींच्या कार्यकर्त्यांना शिवाजी चौकात आंदोनल करताना ताब्यात घेतले होते. अचानक फौजदार चावडी पोलीस ठाण्यासमोर जवळपास ३०० जणांचा जमाव जमला. यावेळी धारकऱ्यांनी मोठमोठ्याने घोषणा देण्यास सुरूवात केली. जमाव पोलिस ठाण्यासमोर वाढू लागला. त्यामुळे पोलिसांना जमाव पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
– विकास देशमुख, दुय्यम पोलिस निरीक्षक, फौजदार चावडी पोलिस ठाणे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news