सोलापूर पुढारी वृत्तसेवा: नियमबाह्य आर्थिक व्यवहार करुन देशद्रोह्यांना मदत करणार्या लोकांशी, राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांचे आर्थिक व्यवहार झालेले आहेत. हे अनेक पुराव्यानिशी सिध्द झाले आहे. मात्र राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार मंत्री नवाब मलिक यांना पाठिशी घालत आहे. त्यांना देशभक्त दाखविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरेाप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. (सोलापूर )
सध्या देशात आणि राज्यात भाजपा सुडबुध्दीने वागत असून जाणीवपूर्वक कारवाया करित असल्याचा आव महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी आणला आहे. मात्र ही गोष्ट साफ खोटी असून राज्यात काम करणार्या तपास यंत्रणा स्वतंत्रपणे काम करित असून त्यांना निदर्शनास आलेल्या लोकांवर कारवाया आणि चौकशी करिता आहे.
मात्र केवळ आपले पाप झाकण्यासाठी महाविकास आघाडी भाजपावर आरोप करित आहे. हेच राज्यातील लोकांना समजून सांगण्यासाठी मंत्री नवाब मलिक हटाव आणि देश राज्य बचाव असा नारा आता भाजपाच्या वतीने देण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रविण दरेकरांनी मंगळवारी सोलापूरातील हेरिटेज मंगल कार्यालयात लॉनवर पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी दरेकर बोलत होते. यावेळी आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख शशी थोरात आदी उपस्थित होते.
यावेळी महाविकास आघाडीतीलच नेत्यावर कारवाई का असा प्रश्न उपस्थित केला? यावेळी दरेकर यांनी भाजप नेत्यांच्या विरोधातील पुरावे पंतप्रधान कार्यालयात दिले असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. मग सध्या राज्यसरकार त्यांचे आहे, त्यांनी त्यांच्या सरकार मार्फत चौकशी करावी, त्यांना कुणी अडवले आहे का? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. भाजपाचे आमदार खासदार दोषी असतील तर यंत्रणांनी त्यांची चौकशी करावी आपली त्यासाठी हरकत नसल्याची कबुली ही त्यांनी दिली आहे.
दरम्यान मुंबई बॉम्बस्फोटात मुख्य आरोपी असलेल्या दाऊद इब्राहिम यांच्याशी संबधीत असलेल्या लोकांशी मलिकांनी आर्थिक संबध ठेऊन कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. त्या गैरव्यवहाराशी संबंधात ईडीकडून चौकशी होत असेल आणि मलिक हे दोषी ठरणार असतील, तर मग महाविकास आघाडीचे नेते मलिकांच्या समर्थनार्थ आंदोलन का करतात? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.
राज्यातील जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवणे अपेक्षित असताना महाविकास आघाडीतील नेते हे मलिकांचे जागतिकीकरण करण्यात व्यस्त आहेत. संविधानिक पेच निर्माण होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा भाजपा यापेक्षा उग्र आंदोलन करेल असा इशारा देखील यावेळी प्रवीण दरेकर यांनी दिला.
आणखी काय म्हणाले प्रविण दरेकर
राज्यपालांच्या वक्तव्याचा विपर्यास केला
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आम्हाला आणि संपूर्ण देशाला अभिमान आहे. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि दोन दिवसापूर्वी छत्रपतींबद्दल जे वक्तव्य केले. त्या वक्तव्याचा विपर्यास करुन त्या विषयाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये असे विरोधी पक्षनेते दरेकर म्हणाले.
हेही वाचा