भन्‍नाट..! सोफा की कार; आनंद महिंद्राही अवाक, म्‍हणाले “आपल्‍याकडील आरटीओ…”

दोन तरुणांनी चक्‍क एका सोफ्याचे रुपांतर कारमध्‍ये केल्‍याचा व्हिडिओ प्रख्‍यात उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे.
दोन तरुणांनी चक्‍क एका सोफ्याचे रुपांतर कारमध्‍ये केल्‍याचा व्हिडिओ प्रख्‍यात उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : प्रख्‍यात उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand mahindra) नेहमी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्स X (पूर्वीचे ट्विटर) वर लक्षवेधी व्‍हिडिओ शेअर करत असतात. त्‍यांनी शेअर केलेले व्‍हिडिओ नेहमी चर्चेत असतात. अनेकवेळा स्‍वत:ला आश्‍चर्याचा धक्‍का देणारे काही मजेदार व्‍हिडिओही ते फॉलोअर्ससोबत शेअर करत असतात. अलीकडेच त्यांनी शेअर केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. दोन तरुणांनी चक्‍क एका सोफ्याचे रुपांतर कारमध्‍ये केले असून यावर आनंद महिंद्रा यांनी मिश्‍कील टिपण्‍णीही केली आहे. ( Anand Mahindra praising viral video )

तरुणांनी सोफ्‍याची बनवली कार

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्‍या व्‍हिडिओमध्‍ये दोन तरुण ऑनलाइन सोफा ऑर्डर करतात. त्याने स्वतः डिझाइन तयार केलेली सोफ्यात चाके आणि एक मोटर बसवली. यानंतर आपल्या अभियांत्रिकी कौशल्याने सोफ्याचे कारमध्‍ये रूपांतर केले. यानंतर दोघेही सोफ्‍यासारखी दिसणार्‍या कारमध्‍ये शहरात फेरफटकाही मारतात. या तरुणांच्‍या कौशल्‍याने आनंद महिंद्रासारखे दिग्गज उद्योगपतीही प्रभावित झाले आहेत. त्याचे कौतुक करणारे ट्विट त्यांनी केले.

Anand Mahindra praising viral video : आरटीओ अधिकारी काय प्रतिक्रिया देतील?

आनंद महिंद्रा यांनी या व्‍हायरल व्‍हिडिओवर प्रतिक्रिया देताना म्‍हटलं आहे की, " फक्त एक मजेदार प्रकल्प? हो, पण हे बनवताना किती काळजी आणि ऑटोमोटिव्ह कौशल्य वापरले गेले ते अविश्वसनीय आहे. एखाद्या देशाला ऑटोमोबाईल क्षेत्रात महाकाय बनण्यासाठी अशा सर्जनशील अभियंत्यांची आवश्यकता आहे. भारतात नोंदणी करण्यासाठी असे वाहन आरटीओ कार्यालयात नेले तर आरटीओ अधिकारी काय प्रतिक्रिया देतील, अशी मिश्‍कील टिप्पणीही आनंद महिंद्रा यांनी केली आहे. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या व्हायरल व्हिडिओला ४.५ लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news