Meesho ने भारतातील किराणा व्यवसाय केला बंद केला, ३०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले

Meesho ने भारतातील किराणा व्यवसाय केला बंद केला, ३०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले

बंगळूर; पुढारी ऑनलाईन : देशातील सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म Meesho ने भारतातील ९० टक्क्यांहून अधिक शहरांमधील (नागपूर आणि म्हैसूर वगळता) सुपरस्टोअर किराणा व्यवसाय बंद केला आहे. यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने ते बेरोजगार झाले आहेत. Inc42 च्या अहवालानुसार, मीशोने सुपरस्टोअर बंद केल्याने जवळपास ३०० कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. याबाबत कंपनीने यावर कोणताही खुलासा केलेला नाही.

मीशोने एप्रिलमध्ये फार्मिसोला सुपरस्टोअर असे नाव दिले. टायर २ मार्केट आणि त्यापुढील दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंसाठी ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी सतत लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने मीशोने फार्मिसोचे सुपरस्टोअर असे रीब्रँडिंग केले होते. पण त्याच महिन्यात कंपनीने १५० हून अधिक कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले. विशेषतः त्यांचा किराणा व्यवसाय एकत्रित करण्याचा त्यांचा उद्देश होता. या सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्मने याआधी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या काळात २०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.

Inc42 च्या अहवालानुसार, कमी महसूल आणि अधिक खर्च हे देशातील बहुतांश शहरांमधील व्यवसाय बंद करण्याच्या Meesho च्या निर्णयामागचे कारण आहे. मीशोचे सुपरस्टोअर कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या सहा राज्यांमध्ये कार्यरत होते. या रिपोर्टमध्ये नमूद केले आहे की मीशोने कामावरून कमी केलेल्यांना दोन महिन्यांचा पगार वेगळे पॅकेज म्हणून देऊ केला आहे.

मीशोचे संस्थापक आणि सीईओ विदित आत्रे यांनी सांगितले होते की कंपनी मीशो सुपरस्टोअरला त्याच्या मुख्य अॅपसह जोडण्यास उत्सुक आहे. "कर्नाटकमध्ये प्रायोगिक तत्त्वावर म्हणून जे सुरू झाले होते त्याला सहा राज्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. लाखो मीशो ग्राहकांना एकाच ठिकाणी खरेदीचा करण्याचा अनुभव घेता येईल. तसेच ते ग्राहक संपादन, तंत्रज्ञान, उत्पादन आणि प्रतिभा अशा क्षेत्रांमध्ये आम्हाला मजबूत समन्वय साधण्याची संधी देईल." असे त्यांनी एका निवेदनात म्हटले होते.

ऑनलाइन किराणा मालाची खरेदी परवडणारी बनवण्यासाठी मीशोने कर्नाटकमध्ये प्रायोगिक तत्त्वावर व्यवसाय सुरु केला होता आणि कंपनीने २०२२ च्या अखेरीस १२ राज्यांमध्ये सुपरस्टोअर उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. Meesho प्लॅटफॉर्म छोटे व्यवसाय प्रदान करते. ज्यामध्ये छोटे आणि मध्यम व्यवसाय (SMBs), सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (MSMEs) आणि वैयक्तिक उद्योजक, ७०० पेक्षा जास्त श्रेणीतील लाखो ग्राहक, संपूर्ण भारतात लॉजिस्टिक्स, पेमेंट सेवा आणि ग्राहक यांचा समावेश आहे. मीशो अलीकडेच १०० दशलक्ष व्यवहार करणाऱ्या यूजर्संपर्यंत पोहोचले आहे. मार्च २०२१ पासून या प्लॅटफॉर्मवर व्यवहार करणाऱ्या यूजर्संची संख्या ५.५ पटीने वाढली आहे. तर त्याच कालावधीत वर्गीकरण 9X ते 72 दशलक्ष वाढले, असा दावा कंपनीने केला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news