पिंपळनेरला सागाच्या लाकडाची चोरटी वाहतूक पकडली

पिंपळनेर : चोरट्या वाहतूकीतून वनविभागाने हस्तगत केलेले पाच नग सागाची लाकडे. (छाया: अंबादास बेनुस्कर)
पिंपळनेर : चोरट्या वाहतूकीतून वनविभागाने हस्तगत केलेले पाच नग सागाची लाकडे. (छाया: अंबादास बेनुस्कर)

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

आदिवासी पश्चिम पट्यातील वार्सा ते कळंबारी रस्त्यावरुन दुचाकींद्वारे होणारी सागच्या लाकडाची चोरटी वाहतूक वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडली. या कारवाईत सागाचे पाच नग जप्त करण्यात आले आहे.

वनविभागाचे अधिकारी शासकीय वाहनाने वार्सा ते कळंबारी रस्त्याने पेट्रोलिंग करत असताना त्यांना संशयित तीन दुचाकी सागवान लाकडाची वाहतूक करताना आढळले. त्यांची तपासणी केली असता दुचाकीस्वार सागचे कटसाईज पाच नग सोडून पसार झाल्याने मुद्देमाल जप्त करून काष्ट विक्री आगार पिंपळनेर येथे आणून जमा करण्यात आले. जप्त केलेले सागवान लाकूड ०.४४३ घ.मी. असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही कारवाई वनसंरक्षक, धुळे दि. वा. पगार, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, सहायक वन संरक्षक प्रादेशिक तथा विभागीय अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेरचे वनपाल संदीप डांगर, शिरवाडेचे वनपाल आर. व्ही. पाटील, वनरक्षक अमोल पवार, देविदास देसाई, गुलाब बारीस, सुमित कुवर यांच्या पथकाने केली. दरम्यान वन व वन्यजीव तसेच अवैध वाहतूक लाकूड संबधित कुठलाही गैरप्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ टोल फ्री नंबर १९२६ वर संपर्क करण्याचे आवाहन म. वनक्षेत्रपाल पिंपळनेर प्रा. धुळे वनविभाग धुळे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news