पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेसच्या डब्या खालून धूर; उडाली एकच खळबळ

पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेसच्या डब्या खालून धूर; उडाली एकच खळबळ
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेसच्या इंजिन पासून चौथ्या डब्याखाली अचानक धूर येऊ लागला. त्यामुळे या एक्सप्रेसमध्ये सकाळी एकच खळबळ उडाली. प्रवासी घाबरले.

मुंबईहून पुण्यात येताना बेगडेवाडी परिसरात आज सोमवारी सकाळी साडेनऊ ते पावणे दहा वाजण्याच्या सुमारास इंटरसिटी एक्सप्रेसच्या चौथ्या डाव्या खालून भकाभक धूर येऊ लागला. यावेळी रेल्वेला आग लागली म्हणून तात्काळ गाडी थांबून पाहण्यात आले.

दरम्यान तोपर्यंत एकच खळबळ उडाली होती, प्रवासी घाबरले होते. रेल्वे अधिकारी कर्मचाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर दहा दहा ते पंधरा मिनिटांनी रेल्वे पुण्याकडे रवाना झाली.

दरम्यान रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांच्याशी याबाबत संवाद साधला असता, ते म्हणाले, गाडीला ब्रेक दाबल्यामुळे चौथ्या डब्या खालून धूर येत होता. त्यामुळे प्रवासी घाबरले. मात्र, ब्रेक दाबल्यानंतर असा धूर कायम येत असतो. इंटरसिटी एक्सप्रेसला आग लागली नव्हती. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. असे त्यांनी स्पष्टीकरण दिले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news